आसनगावनजीक लोहमार्गाला तडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 डिसेंबर 2017

नाशिक रोड - मध्य रेल्वेच्या मार्गावर मंगळवारी सकाळी आसनगावजवळ लोहमार्गाला तडे गेल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

नाशिक रोड - मध्य रेल्वेच्या मार्गावर मंगळवारी सकाळी आसनगावजवळ लोहमार्गाला तडे गेल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

मुंबईकडून नाशिकरोडकडे येणाऱ्या मार्गावर सकाळी नऊच्या सुमारास आसनगावजवळ लोहमार्गाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे या मार्गावरील सर्व गाड्या काही काळ थांबविण्यात आल्या. छत्रपती शिवाजी टर्मिनल्स भागलपूर एक्‍स्प्रेस व पुष्पक एक्‍स्प्रेस आसनागावजवळ थांबविण्यात आल्या. लोहमार्गाचे काम झाल्यानंतर या गाड्या रवाना झाल्या. दरम्यान, उत्तर भारतातील दाट धुक्‍यामुळे भुवनेश्वर एलटीटी एक्‍स्प्रेस, गरीब रथ, महानगरी, बनारस एक्‍स्प्रेस आदी गाड्यांना चार ते पाच तास विलंब झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik road news railway line damage