नाशिकचा पारा 40.9 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

नाशिक ः नाशिकमध्ये बुधवारी (ता.24) सूर्य अक्षरशः आग ओकत होता. नाशिकचा कमाल पारा 40.9 अंश सेल्सिअसवर पोचला असून, यंदाच्या मोसमातील उच्चांकी नोंद झाली आहे. येत्या शनिवारपर्यंत नाशिकसह राज्यात उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे कमाल व किमान तापमानात मोठी घसरण झाली होती. पण आज कमाल तापमानाची नोंद 40.9 अंश सेल्सिअस झाली आहे. यंदाच्या मोसमातील हे उच्चांकी तापमान आहे. उन्हाच्या झळांनी नाशिककरांची लाहीलाही झाली. या उकाड्यामुळे नागरिकांना घरात झोपणेही असह्य झाले. आज सकाळी साडेआठ- नऊच्या सुमारासच उन्हाचे चटके जाणवू लागले होते. तर शहरातील बहुतांश रस्त्यांवर सकाळी अकरा ते दुपारी चार- साडेचारपर्यंत शुकशुकाट जाणवत होता. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचे जनजीवनावर झाला.

गेल्या चार दिवसांतील कमाल तापमान
24 एप्रिल ः 40.9
23 एप्रिल ः 40.1
22 एप्रिल ः 38.2
21 एप्रिल ः 37.7

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik temperature at 40.9 Degree celsius