नाशिक- जिल्हा नियोजन योजनेतून विकासकामांसाठी वर्षाअखेर दहा कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यातील दहा टक्के म्हणजेच एक कोटी रुपये ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहतींसाठी मूलभूत सुविधा देण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर झालेल्या बैठकीत दिली.