Nashik Accident News : क्रेनच्या धडकेत एकाचा मृत्यू तर दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Nashik Accident News : क्रेनच्या धडकेत एकाचा मृत्यू तर दोघे जखमी

नामपूर : औरंगाबाद- अहवा राज्यमार्गावर ताहाराबाद-सोमपूर रस्त्यादरम्यान पायी चालणाऱ्या तिघांना क्रेनने धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : चोरीछुप्या हुक्का पार्लर चालविणाऱ्या हॉटेलवर छापा; सापडल मोठ घबाड

ताहाराबाद येथील सब स्टेशन आदिवासी वस्तीतील रहिवासी गोपा रामचंद्र पवार (वय ५५) हे पत्नी व मुलीसह गावाकडून किराणा घेऊन परतत असताना ताहाराबाद सोमपूर रस्त्यावरील रामनगरजवळ पाठीमागून येणाऱ्या क्रेनने तिघांना जोरदार धडक दिली. यात, गोपा पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, पत्नी बायजाबाई (वय ५०) व मुलगी छाया (वय १७) हे दोघे जखमी झाले आहेत. जायखेड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनाथ रसाळ तपास करीत आहेत.

हेही वाचा: Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : हजार किलोमीटरचा प्रवास करीत ते निघालेत अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी!

''ताहाराबाद सोमपुर रस्त्यावर पायी चालणाऱ्या ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने रस्त्यावरील साईड पट्ट्या दुरुस्त करणे गरजेचे बनले आहे. मात्र संबंधित विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी.'' - सचिन कोठावदे, संचालक सटाणा मर्चंट बँक

टॅग्स :Nashikaccidentdeath