Nashik Crime News : चोरीछुप्या हुक्का पार्लर चालविणाऱ्या हॉटेलवर छापा; सापडल मोठ घबाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik crime news

Nashik Crime News : चोरीछुप्या हुक्का पार्लर चालविणाऱ्या हॉटेलवर छापा; सापडल मोठ घबाड


नाशिक :
शहर परिसरातील हॉटेल्समध्ये चोरीछुप्यारितीने हुक्का पार्लर चालविले जात असल्याचे सातत्याने बोलले जात होते. शहर पोलिसांनी सातपूर हद्दीतील अण्णाचा मळा आणि डेझर्ट शीप या हॉटेल्सवर मध्यरात्री छापा टाकला. हुक्क्याच्या पॉटसह प्रतिबंधित तंखाबुचे विविध फ्लेव्हर असा सुमारे लाखाचा मुद्देमाल जप्त करीत हॉटेल मालकांसह हुक्क्याचे सेवन करणाऱ्या ग्राहकांवर गुन्हे दाखल केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘सकाळ’मधून नाशिकमधील अंमल पदार्थांचा सुरू असलेल्या व्यवसायावर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती.

हेही वाचा: Nashik News : ‘साहेब, लाईट कधी येईल होऽऽ’; अंबासनच्या त्रस्त कांदा उत्पादकांची आर्त हाक


नाशिक शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांना सातपूर परिसरातील पिंपळगाव ढगा शिवारात असलेल्या डेझर्ट शीप या हॉटेलमध्ये चोरी-छुप्यारितीने हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, युनिट दोनच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकला असता, हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचे निष्पन्न झाले. सातपूर पोलिसात हॉटेल मालक अभिषेक सुब्रमण्या मंजिताया (रा. मातृछाया अपार्टमेंट, भाभानगर, मुंबई नाका) याच्यासह हुक्क्याचे सेवन करणाऱ्या ग्राहकांविरोधात कोटपाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये पोलिसांनी ३१ हजार रुपयांचे ३१ हुक्का पॉट पाईपसह बॉक्स, २ हजार ५०० रुपयांचे २५ हुक्का फिल्टर बॉक्स, २ हजार ९०० रुपयांचा व्हाईट डोम तंबाखु, २ हजार ९०० रुपयांची पिंक मिशिप तंबाखु, २९०० रुपयांची स्प्रिंग वॉटर तंबाखु, २९०० रुपयांची छबल ॲपल तंबाखु, २९०० रुपयांची ब्लुबेरी तंबाखू, २९०० रुपयांची मघई पान तंबाखु, २९०० रुपयांची रसना तंबाखु, ३०० रुपयांचा कोयला बॉक्स, ३ हजार रुपयांचा फ्लेवर कार्टनचे दोन बॉक्स, १५०० रुपयांचा फ्लेवर कार्टन व्हाईट रोजचे दोन बॉक्स, एक हजाराचे स्मोक मशिन असे ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. सदरची कारवाई गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व त्यांच्या पथकाने केली.

हेही वाचा: Nashik Crime News : बळजबरीने कर्जवसुली अन् कर्जदाराच्या पत्नीचाही विनयभंग! सावकाराला अटक


शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती शाखेने सातपूर हद्दीतीलच बजरंगनगरमधील हॉटेल अण्णाचा मळा याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना हॉटेल अण्णाचा मळा याठिकाणी हुक्का पार्लर चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. मध्यरात्री मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने छापा टाकला असता, त्याठिकाणी हुक्क्यांमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केले जात असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी हॉटेल मालक जितेश बरवीर पाठक (३०, रा. राधाकृष्ण अपार्टमेंट, राधाकृष्णनगर, अशोकनगर, सातपूर), व्यवस्थापक गोविंद भगवान अवचार (१९, रा. राधाकृष्णनगर, अशोकनगर, सातपूर) या दोघांसह ग्राहकांविरोधात कोटपाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याठिकाणी हुक्का पॉटसह प्रतिबंधित सुगंधित तंबाखुजन्य पदार्थ व साहित्य असा ६ हजार ५९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: Nashik News : खेकडा पालनाचा प्रयोग यशस्वी; निसर्गाच्या भरवश्यावरील पारंपारिक शेतीला शोधला पर्याय

अखेर ‘शिक्कामोर्तब’
शहरातील अंमली पदार्थाच्या सुरू असलेला अवैध व्यवसायामुळे नशेच्या आहारी जाणारी तरुणाई याबाबत ‘सकाळ’मधून वृत्तमालिका प्रकाशित झाली होती. या वृत्त मालिकेचे पडसाद नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाली अधिवेशनात उमटले असून, आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधीतून सभागृहाचे व गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले. दुसरीकडे पोलिसांनीही कारवाई सुरू केल्याने, एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.

मात्र, नवनियुक्त आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील अंमली पदार्थ तस्करी व व्यवसायाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी ‘ॲण्टी नार्कोटिक्सड्रग्ज्‌ स्कॉड’ तयार केले आहे. लवकरच या स्कॉडमार्फत शहरातील अंमली पदार्थाचा अवैध व्यवसायिकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा: Crime News : थेट तहसील दारांनाच मागितली खंडणी; दोघांवर गुन्हा

टॅग्स :NashikCrime NewsDrugs