
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासाठी नाशिकमध्ये 1 लाख 30 हजार झेंडे
नाशिक : नाशिकला ‘हर घर झेंडा’ या उपक्रमाची जोरदार तयारी सुरू असून, जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार आज नाशिकसाठी एक लाख ३० हजार झेंडे दाखल झाले आहेत. पुरवठा विभागाकडून हे झेंडे रेशन दुकानदारांसह ग्रामपंचायतीला वाटपासाठी दिले जाणार आहेत. (1 Lakh 30 thousand flags in Nashik for Amrit mohotsava of Independence Latest marathi news)
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने केंद्र शासनातर्फे ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी देशभर तयारी सुरू आहे. देशातील सामान्य नागरिकालाही प्रथमच देशाचा तिरंगा झेंडा लावता येणार आहे.
विशेष म्हणजे त्यासाठी ध्वजसंहितेत बदल करण्यात आला आहे. प्रत्येक घरावर झेंडा लावण्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा भाग म्हणून शासकीय पातळीवरून झेंडे वितरित करण्यात येणार आहेत.
प्रत्येक विभागाला त्यासाठी नियोजनात सहभागी करून घेण्यात आले आहे. पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली चालणाऱ्या या नियोजनात नाशिक जिल्ह्यासाठी एक लाख ३० हजार तिरंगी झेंडे लावले जाणार आहेत. पुरवठा विभागाकडून सुरू असलेल्या या तयारीसाठी जिल्ह्यासाठी एक लाख ३० हजार झेंडे जिल्ह्यासाठी आले आहेत.
हेही वाचा: MSRTC कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 100 कोटी मंजूर
रेशन दुकानातून झेंडे
पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात तिरंगी ध्वज वितरणाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांना हे झेंडे पोचविण्यासाठी रेशन दुकानांसह ग्रामपंचायतीद्वारे ग्रामीण भागात हे झेंडे घरोघर पोचविले जाणार आहेत. आज झेंडे दाखल झाल्यानंतर पुरवठा विभागाकडून रेशन दुकानांमार्फत झेंडे पोचविण्याचे नियोजन सुरू झाले.
हेही वाचा: Nashik : पंचवटीत 2 दिवस पाणीपुरवठा बंद
Web Title: 1 Lakh 30 Thousand Flags In Nashik For Amrit Mohotsava Of Independence Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..