
क्रूझर पलटी होऊन 1 युवती ठार 7 जखमी
इगतपुरी (जि. नाशिक) : नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात बुधवार ( ता.११ रोजी ) पहाटे धबधबा पॉईंटच्या पुढे वळणावर ( स्टोन कि मी क्रं 472 .8 ) येथे क्रूझरकार ( क्रं.MH - 22- U - 2801 ) हिच्यावरील चालक हा भरधाव वेगात वाहन नेत असतांना वाहनावरील नियंत्रण सुटून पलटी होऊन रोडच्या बाजूला संरक्षण भिंतीला आदळुन झालेल्या अपघातात (Accident) एक युवती जागीच ठार झाली तर 7 जण किरकोळ जखमी झाले आहे. (1 young woman killed 7 injured in cruiser Accident Nashik Accident News)
हेही वाचा: प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेसाठी विधवा महिलेची फरफट
या अपघातात दर्शना विजय कांबळे ( वय 11 वर्ष रा.मंठा जि.जालना ) ही मयत झाली असून तसेच
1) लिलाबाई लिंबाजी राठोड वय -30 वर्ष रा. मालेगाव.
2) लिंबाजी राठोड वय-40 वर्षे रा . मालेगाव.
3) विठ्ठल चव्हाण वय - 45 रा. वसई.
4) जयश्री गजानन पवार वय -34 रा. वसई
5) अनवी गजानन पवार वय-1 वर्ष रा.वसई
6) कल्पना राजेश जाधव वय- 30 वर्ष रा. वसई
7) शामराव चव्हाण वय -60 वर्ष रा. वसई
हे सर्वजण किरकोळ जखमी झाले असून सदर मयतास व जखमीस टोलनाका अॅंबुलन्सने कसारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला केले असून दोन्ही लेन वाहतूक सुरळीतपणे चालू आहे.
हेही वाचा: नाशिक : स्वर्ण पॅलेसला ७२ लाखांचा चुना
Web Title: 1 Young Woman Killed 7 Injured In Cruiser Accident Nashik Accident News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..