Nashik News : मालेगावसह कसमादेत आंबा विक्रीतून 10 कोटीची उलाढाल

mangoes at Sardar Chowk.
mangoes at Sardar Chowk. esakal

Nashik News : अक्षयतृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर मालेगावसह कसमादेत दिवसभर आंब्यांची रेलचेल होती. आंबा विक्रीची शेकडो दुकाने जागोजागी लावण्यात आली आहे. पित्तराचा सण असल्याने फळांचा राजा दिमाखात सामान्यांच्या घरात पोचला. (10 crore turnover from mango sale in Malegaon and Kasmade nashik news)

कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यातून गेल्या तीन दिवसात अडीचशे ट्रक आंबा कसमादेत आला. आंबा विक्रीतून दहा कोटीच्या आसपास उलाढाल झाली. दरम्यान आवक वाढल्याने आंब्यांचे भाव सामान्यांच्या आवाक्यात आले. घाऊक बाजारात ४० ते ६० रुपये किलो दरम्यान आंबा विकला गेला.

किरकोळ बाजारात आंब्याचे दर किलोला ७० ते १२० रुपये होता. अक्षयतृतीयेच्या पाश्‍र्वभूमीवर आंब्यासह मातीच्या घागरी, खरबूज आदींची देखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सणाच्या पूर्वसंध्येला किराणा बाजारही गर्दीने फुलून गेला होता. खान्देशसह कसमादेत पारंपारिक प्रथा, परंपरा जोपासल्या जात आहे.

अक्षयतृतीया सणाला खान्देशमध्ये ‘आखाजी’ म्हणून संबोधले जाते. दिवाळीनंतर साडेतीन मुहूर्तपैकी एक अक्षयतृतीया आहे. काळाच्या ओघात सणाच्या काही प्रथा-परंपरा कमी होत गेल्या आहे. असे असले तरी पित्तरांचा सण म्हणून अक्षयतृतीया उत्साहात साजरी केली जाते. कसमादेसह खान्देशमध्ये हजारो कुटुंबीय अक्षयतृतीयेला पित्तरांना आमरसाचा नैवेद्य दाखविल्याखेरीज आंबा खात नाहीत. त्यामुळे सणाएवढे आंब्यांनाही महत्त्व आले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

mangoes at Sardar Chowk.
Festivals 2023 : अक्षय तृतीया, ईदसाठी झळाळी; आंबा, शिरखुर्म्याचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

येथील घाऊक विक्रेत्यांनी पंधरा दिवसापूर्वीच आंब्याचे नियोजन केले होते. कोकण वगळता राज्यातील इतर भागात पुरेसा आंबा नाही. बेमोसमी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले. घाऊक विक्रेत्यांनी या वर्षी कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणावर आंबा येथे विक्रीसाठी आणला.

मालेगावात गेल्या दोन दिवसात ८० ट्रक तर चांदवडला २५ ट्रक आंबा विक्रीसाठी आला. बाजारात बदाम ७० ते ८० रुपये, लालबाग ७० ते ९० रुपये, केशर ९० ते १५० रुपये, मलिका आंबा ६० ते ७० रुपये दरम्यान विकला गेला. कोकणमधील हापूस आंबा अडीचशे ते तीनशे रुपये किलोने विकला जात होता.

"अक्षयतृतीयेसाठी पंधरा दिवसापासूनच आंब्यांचे नियोजन केले होते. आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेने भाव दहा टक्क्यांनी कमी झाला. अक्षयतृतीया सणानंतर आवक आणखी वाढून भाव आणखी कमी होतील. निसर्गाने साथ दिल्यास नागरिकांना कमी दरात पुढील दोन महिने आंब्याचा गोडवा चाखता येईल." - आर. एस. बागवान संचालक, रोशनी सितारा फ्रुट, चांदव

mangoes at Sardar Chowk.
Ramzan Eid : देशाच्या सुख, समृद्धीसाठी विशेष प्रार्थना; पारंपरिक उत्साहात बोहरा बांधवांकडून रमझान ईद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com