नाशिक- परीक्षेला सामोरे जाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा केलेला प्रवास, अंतिम काही मिनिटांमध्ये परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी घेतलेली धाव... बायोमॅट्रिक हजेरीसाठी लागलेली विद्यार्थ्यांची रांग... असे काहीसे चित्र रविवारी (ता. ४) झालेल्या नीट यूजी २०२५ परीक्षेदरम्यान पाहायला मिळाले. नाशिकच्या २२ केंद्रांवर दहा हजार १२० विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. पदवीस्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या या परीक्षेत भौतिकशास्त्राचे प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांची कसोटी लागली.