District Onion-Potato Election : हिरे बंधूंसह धनवटे, कुंभार्डे, घुगे, गुळवे, डोखळे यांचे अर्ज दाखल

Present Director Rajaram Dhanwate, Dr. Candidates along with Atmaram Kumbharde.
Present Director Rajaram Dhanwate, Dr. Candidates along with Atmaram Kumbharde.esakal

District Onion-Potato Election : जिल्हाभर कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी (ता. २९) १५ जागांसाठी एकूण तब्बल १०५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

प्राप्त अर्जांची गुरुवारी (ता. ३०) छाननी होऊन १ डिसेंबरला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. विद्यमान संचालक अद्वय हिरे अडचणीत सापडल्याने त्यांचे बंधू अपूर्व हिरे यांनी अर्ज दाखल केला.(105 candidates applied in Election of District Onion Potato Producers Cooperative Union nashik news)

जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक संघाची अंतिम मतदार यादी जाहीर झाली. यात सोसायटी गटातून २७७, तर वैयक्तिक सभासद गटातून एक हजार ३२७ मतदार आहेत. जिल्हा सहाय्यक निबंधक मनीषा खैरनार निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार २२ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली.

अर्ज दाखल करण्याचा बुधवार अंतिम दिवस होता. त्यामुळे इच्छुकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मोठी गर्दी केली होती. आजपर्यंत १६९ अर्जांची विक्री झाली आहे. १५ जागांसाठी एकूण १०५ अर्ज दाखल झाले आहेत.

यात प्रामुख्याने विद्यमान संचालक राजाराम धनवटे, रामचंद्र घुगे, अद्वय हिरे, अपूर्व हिरे, अॅड. संदीप गुळवे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, राजेंद्र डोखळे, रत्नाकर चुंभळे, लक्ष्मीकांत (मुन्ना) कोकाटे, गुणवंत होळकर, चंद्रकांत कोशिरे, भाऊसाहेब ढिकले, बापूसाहेब कुंदे, माणिक वनारसे, बाळासाहेब वाघ, नंदू सांगळे, राजाभाऊ खेमनार, अशोक आखाडे आदींचा समावेश आहे.

Present Director Rajaram Dhanwate, Dr. Candidates along with Atmaram Kumbharde.
District Onion-Potato Union Election: कांदा-बटाटा संघासाठी 31 डिसेंबरला मतदान! पहिल्याच दिवशी 39 अर्जांची विक्री

अर्ज दाखल करण्यास सुरवात झाल्यानंतर राजकीय हालचालींना देखील सुरवात झाली असून पॅनेल नेतृत्वाकडून भेटी गाठी घेतल्या जात आहे. संघाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची परंपरा आहे. मात्र,यंदा इच्छुकांची संख्या वाढली असल्याने नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.

असे प्राप्त झाले अर्ज गट प्राप्त अर्ज

संस्था, सोसायटी गट (७ जागा) ३६

वैयक्तीक सभासद गट (३ जागा) २३

महिला राखीव (२ जागा) १०

अनु, जाती-जमाती गट (१ जागा) ०४

इतर मागासवर्गीय गट (१ जागा) २५

विशेष मागासवर्गीय गट (१ जागा) ०७

Present Director Rajaram Dhanwate, Dr. Candidates along with Atmaram Kumbharde.
Onion And Potato Price : कांदा-बटाट्याचे भाव गडगडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com