Nashik News : पालखेड पाटबंधारे विभागाकडून 105 टक्के पाणीपट्टी वसुली

Dam
Damesakal

येवला (जि. नाशिक) : पाठपुरावा करून वसुलीची विशेष मोहीम राबविल्याने पालखेड पाटबंधारे विभागाने २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षात उद्दिष्टापेक्षा अधिक वसुली करण्यात यश मिळवले आहे.

पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात यशस्वीपणे पाणीपट्टी वसुली मोहीम राबविताना या आर्थिक वर्षात विभागाने जिल्ह्यात एकूण १०५.८३ टक्के वसुली केली आहे. (105 percent water dues recovered from Palkhed Irrigation Department Nashik News)

सिंचन व बिगर सिंचन ग्राहकांना योग्यरीत्या पाणीपुरवठा केला जातानाच पाणीपट्टी वसुलीसाठीचे योग्य नियोजन केल्यास दृष्टिक्षेपात ठेवलेली फल निष्पत्ती होते हे जलसंपदा विभागाच्या पालखेड पाटबंधारे विभागाने दाखवून दिले आहे.

पालखेड पाटबंधारे विभागातर्फे आपल्या लाभक्षेत्रातील पाणी वापर सहकारी संस्थांना मागील आणि यंदा देखील योग्यरीत्या पाणीपुरवठा केला गेला होता. त्यामुळे पालखेड पाटबंधारे विभागाच्या पाणीपट्टी वसुली मोहिमेच्या पाणी वापर संस्थांच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने यंदा पाणीपट्टी दिली.

तर दुसरीकडे बिगर सिंचन ग्राहकांकडील पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठा तगादा लावल्याने अनेक बिगर सिंचन संस्थांकडील जुन्या थकबाकीसह वसुली झाली.

पालखेड पाटबंधारे विभागाने नुकत्याच संपलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सिंचन ग्राहकांकडे १ कोटी ५५ लाख ५३ हजार रुपयांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले होते. त्यापैकी १ कोटी ३१ लाख २१ हजार रुपये (८४.३६ टक्के) इतकी वसुली झाली आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Dam
Traffic Management : हनुमान जयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणुन घ्या पर्यायी मार्ग

तर बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीसाठी विभागाने या आर्थिक वर्षात १४ कोटी ९३ लाख ४१ हजार रुपये इतके उद्दिष्ट ठेवले होते. येथे बिगर सिंचनाची १६ कोटी १३ लाख ७१ हजार रुपये (१०८ टक्के) इतकी पाणीपट्टी वसुली झाली आहे.

सिंचन आणि बिगर सिंचनाचे मिळून १६ कोटी ४८ लाख ८४ हजार रुपये इतके वसुली उद्दिष्ट पालखेड पाटबंधारे विभागाने ठेवले होते. त्यात उद्दिष्टापेक्षा अधिक वसुलीचे यश या विभागाला मिळाले आहे. सिंचन आणि बिगर सिंचनाची एकत्रित एकूण १७ कोटी ४४ लाख ९२ हजार रुपये (१०५.८३ टक्के) इतकी पाणीपट्टी वसूल झाली आहे.

पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र बधान, उपविभागीय अभियंता विश्वास चौधरी, प्रशांत गोवर्धने, हर्षद देवरे, संजय सोनवणे, संभाजी पाटील, तसेच सर्व शाखाधिकारी, दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, सिंचन व्यवस्थापनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चालू आर्थिक वर्षातील ही पाणीपट्टी विशेष वसुली मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.

Dam
Saptashrungi Devi : आदिमायेच्या दर्शनाने भाविक तृप्त; सप्तशृंगगडावर भाविकांचा महापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com