Traffic Management : हनुमान जयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणुन घ्या पर्यायी मार्ग

Traffic Police
Traffic Policeesakal

नाशिक : शहरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त शहरात गुरुवारी (ता. ६) ठिकठिकाणी मिरवणूका व महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. या पार्श्वभूमीवर भद्रकाली व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असते.

त्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचा उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे. (Traffic Management Changes in traffic routes on occasion of Hanuman Jayanti use alternative route nashik news)

गुरुवारी (ता. ६) शहरात ठिकठिकाणी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या जयंती दिनानिमित्ताने शहरातील पंचवटी भागातून मोठ्या प्रमाणात मिरवणूकींचे आयोजन करण्यात आलेले आहे. पंचवटी व भद्रकालीतील रस्त्यांची रुंदी पाहता यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे.

त्यामुळे कोणतीही दूर्घटना घडू नये, यासाठी शहर पोलिसांच्या वतीने जादा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अरुंद रस्त्यांवर मिरवणुका निघणार असल्याने वाहतूक कोंडी होऊन समस्या निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

त्यापाश्‍र्वभूमीवर पोलिसांनी मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी रसत्यावरून वळविली आहे. त्यानुसार, वझरे मारुती मंदिर, चौकमंडई, भद्रकाली दूधबाजार, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट, सांगली बॅंक सिग्नल, मेहेर, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड पंचवटी या मार्गाने मिरवणूका निघणार असून, सदर मिरवणूक मार्ग वाहतूकीसाठी दुपारी ३ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद असेल.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Traffic Police
Gold Purchase : सोनं खरेदी करायचंय? मग ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे

त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी वाहतुक मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे.

पर्यायी मार्ग

* बागवान पुरा पोलीस चौकी ते अमरधाम रोड ते पंचवटी असा मार्ग

* सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल, मोडक सिग्नल, शालिमार, सीबीएस, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, पंचवटी असा मार्ग

* पंचवटी कारंजाकडून येणारी वाहतूक मखमलाबाद नाका, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका असा मार्ग

* सीबीएसकडून पंचवटीकडे जाणारे मेहेल सिग्नल, अशोकस्ंतभ, घारपुरे घाट, रामवाडी पुल, मखमलाबाद मार्गे पंचवटीकडे

Traffic Police
Ramzan Festival: विशेष बाजारांची सामान्यांना भुरळ; मालेगावला रमजानानिमित्त दररोज लाखोची उलाढाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com