esakal | आमझर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ११ बकऱ्या ठार; पशुपालक हवालदील
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

आमझर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ११ बकऱ्या ठार; पशुपालक हवालदील

sakal_logo
By
हंसराज भोये

सुरगाणा (जि. नाशिक) : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आमझर येथील पशुपालक चिंतामण गंगाजी वाघमारे (वय ४७) यांच्या तेरा बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात ११ बकऱ्या ठार, दोन बकऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.


रविवारी (ता. ४) आमझर येथे आदिवासी पारंपरिक पद्धतीने रानभाजी खाण्याचा सण होता. त्यामुळे पशुपालकाने जंगलात चारण्याकरीता घेतलेल्या पंधरा ते वीस बकऱ्या जंगलात सोडून तो सण असल्याने निघून आला. नेहमीप्रमाणे अंधार पडला की बकऱ्या जंगलातून घराकडे परतायच्या. मात्र, शेतातील झापावर बकऱ्या परतल्याच नाहीत. तेरा बकऱ्या जंगलातील भोवर हेदीचा दरीत राहिल्या. याच दरीत खडकाची कपार असल्याने बिबट्याचा अधिवास असतो. रात्रीच्या सुमारास बकऱ्यांच्या कळपावर अचानक हल्ला चढवला. त्यात या बकऱ्या ठार झाल्या. हा भाग गुजरात राज्याचा सिमावर्तीलगतचा राखीव जंगलाचा आहे. त्यामुळे अशा घटना पावसाळ्यात नेहमीच घडत असतात. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ललिता नाळे यांनी शवविच्छेदन केले असून, अहवाल वनविभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(11 goats killed in leopard attack in amzhar nashik news)

हेही वाचा: परमवीर सिंगच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलीसाकडून गंभीर आरोप

loading image