esakal | परमवीर सिंगच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलीस उपअधीक्षकांचा गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

parambir singh

परमवीर सिंगच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलीसाकडून गंभीर आरोप

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा खळबळजनक आरोप नाशिकचे पोलीस उपअधीक्षक शामकुमार निपुंगे यांनी केला असून, यामुळे चार वर्षांपूर्वीच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. शिवाय परमवीर सिंग यांच्या अडचणीतही वाढ होणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.(allegation-of-Nashik-DSP-Shamkumar-Nipunge-on-parambir-singh)

महिला पोलीस कॉन्स्टेबल मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण; शामकुमार निपुंगेंचा आरोप

२०१७ साली महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार यांनी कळवा येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद त्यावेळी नोंदवण्यात आली आहे. मात्र ती आत्महत्या नसून पवार यांचा खून झाला आहे. यात तत्कालीन ठाण्याचे आणि सध्याचे वादग्रस्त पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनीच मला या गुन्ह्यात विनाकारण गोवल्याचा गंभीर आरोप पोलीस उपअधीक्षक निपुंगे यांनी केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे आणि सुभद्रा पवार यांच्यात प्रेमप्रकरण रंगले होते. मात्र फापाळे यांनी लग्नाला विरोध केल्याने दोघांमध्ये वाद विकोपला गेले. सदर महिला माझ्या बहिणीच्या गावची असल्याने मदत करायचे ठरवले आणि त्याच दिवशी या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकूणच, सुभद्रा पवार यांनी आत्महत्या केली नसून तिचा खून केल्याचा खळबळजनक आरोप पोलीस उपअधीक्षक शामकुमार निपुंगे यांनी केला असून, त्यांच्या अंगावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. त्यादेखील लपवण्यात आल्याचे निपुंगे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात

२०१७ साली निपुंगे हे भिवंडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त असताना इथल्या मल्टी वेहीकल गोडाऊनवर करत असलेल्या कारवाईचा राग मनात धरून त्यावेळेस असलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनीच बदली केली होती. तिथून मिळणारे बेकायदेशीर उत्पन्न बंद झाल्याने मला या महिलेच्या मृत्यू प्रकरणात दोषी ठरवल्याचे शाम कुमार निपुंगे यांनी सांगितले आहे.

'त्याच' डॉक्टरांनी केले 'पीएम'

मनसुख हिरन यांचे पोस्ट मार्टम करणाऱ्या डॉक्टरांनीच त्यावेळी सुभद्रा पवार यांचे पोस्टमार्टम करून पुरावे नष्ट करण्यासाठी परमवीर सिंग यांनीच मदत केल्याचाही आरोप निपुंगे यांनी केला आहे. दरम्यान, परमवीर सिंग यांचे राइट हॅन्ड क्राईमचे सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांनीच शामकुमार निपुंगे हे निर्दोष असून, परमवीर सिंग यांच्या सांगण्यावरून निपुंगे यांना यात गुंतवल्याची कबुली दिली आहे, तसा स्टिंग विडिओ सुद्धा निपुंगे यांच्या हाती लागला आहे.

loading image