Nashik Crime News : 11 लाखांचा मद्यसाठा जप्त; जायखेडा पोलिसांची कारवाई

Suspect accused with liquor seized in police action. including police officers and staff.
Suspect accused with liquor seized in police action. including police officers and staff.esakal

जायखेडा (जि. नाशिक) : अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनावर जायखेडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत ११ लाख ५७ हजार दहा रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. (11 lakh worth liquor stock seized by Jaikheda police action Nashik Latest Crime News)

Suspect accused with liquor seized in police action. including police officers and staff.
Nashik Crime News : बंदुकीच्या धाकाने घेतले 5 लाखांचे दागिने

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सटाण्याकडून पिंपळनेरकडे जात असताना ताहाराबाद रोडवरील अंतापूर चौफुलीजवळ सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकृष्ण पारधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून विनापरवाना मद्याची वाहतूक करणाऱ्या सिल्व्हर रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या XUV ५०० कारमधून (क्र. जीजे- १९- एए- ३३८८) विदेशी कंपनीचा जवळपास ११ लाख ५७ हजार १० रुपये किंमतीचा विविध प्रकारचा मद्यसाठा जप्त केला.

शुक्रवारी (ता. १४) सकाळी दहाला ही कारवाई करण्यात आली. सदर मद्यसाठा बागलाण तालुक्यातून धुळे जिल्ह्यात विक्रीसाठी नेला जात होता. या प्रकरणी किसन लक्ष्मण गामी (वय ३०, रा. २०४ सूर्यमुखी अपार्टमेंट, वरचा सुरत, हिराबाग सर्कल सुरत), उमेश किसन यादव (वय २८, रा. नेहरू गार्डन, नवापूर) या दोघांना अटक करण्यात आली. जायखेडा पोलिसात मद्याची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जायखेड्याचे पोलिस निरिक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलिस कर्मचारी सुनील पाटील, जितू पवार, जी. एल. भोये आदींनी कारवाई केली.

Suspect accused with liquor seized in police action. including police officers and staff.
Nashik : तब्बल 11 वर्षानंतर निवृत्त मुख्याध्यापिकेला न्याय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com