Nashik News: रेल्वे विभागात जनावर अपघाताचे 112 गुन्हे दाखल; गोठामालकांना नोटिसा

चालू वर्षात भुसावळ रेल्वे विभागात जनावर अपघाताचे ११२ गुन्हे दाखल झाले आहेत.
Officers and employees of Nashik Road 'RPF' while giving notices to cow owners.
Officers and employees of Nashik Road 'RPF' while giving notices to cow owners.esakal

नाशिक रोड : जनावरांचा अपघात, हा भारतीय रेल्वेचा चिंतेचा विषय आहे. जनावरे रेल्वेखाली चिरडण्याच्या अपघातामुळे रेल्वेच्या मालमत्तेचे, रेल्वेच्या वेळेचेही नुकसान होते.

प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येते. चालू वर्षात भुसावळ रेल्वे विभागात जनावर अपघाताचे ११२ गुन्हे दाखल झाले आहेत. (112 cases of animal accident registered in railway department Notices to herdsmen Nashik News)

भुसावळ मध्य रेल्वे व्यवस्थापकांनी याबाबत १५ दिवस सघन अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार भुसावळ विभागात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी गुरे रुळावर चिरडण्याची शक्यतेबाबत विश्लेषण करण्यात आले.

या अभियानात एकूण पाच हजार ५५१ जणांना ताकीद देण्यात आली, ५३० पशुपालकांना नोटीस बजावण्यात आली. रेल्वेच्या जमिनीवर जनावरे चारणाऱ्यांवर रेल्वे कायद्यान्वये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले.

रेल्वे मार्गाजवळ व रेल्वेच्या जमिनीवर कचरा, खाद्यपदार्थ आदी टाकू नये, तसेच रेल्वेच्या जमिनीवर, रेल्वे मार्गाच्या आजूबाजूला गुरे चारणे टाळावे आणि अपघात प्रतिबंधास मदत करावी, असे आवाहन भुसावळ विभाग व्यवस्थापक इति पांडे यांनी केले आहे.

Officers and employees of Nashik Road 'RPF' while giving notices to cow owners.
Nashik News: लग्नातील फटाक्यांच्या आवाजाने पक्षी बेशुद्ध : सुदाम डेमसे

विश्लेषणानंतर भुसावळ विभागात अशी एकूण ६४ संवेदनशील ठिकाणे ओळखण्यात आली आहेत. पॅन्ट्रीकार कर्मचारी, रेल्वे यात्री आणि रहिवाशांकडून रेल्वे रुळांजवळ कचरा टाकला जात असल्यामुळे असे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

यावर उपाय योजनेसाठी दहा ठिकाणी कुंपण बांधण्यात आले. पाच ठिकाणी सीमाभिंत बांधण्याचे काम सुरू आहे. उर्वरित ठिकाणीही हद्दवाढीचे काम प्रस्तावित असून, ते प्रगतिपथावर आहे. रेल्वे सुरक्षाबल, रेल्वे अभियांत्रिकी विभागाद्वारे हे काम करण्यात आले.

Officers and employees of Nashik Road 'RPF' while giving notices to cow owners.
Ayodhya Ram Mandir: रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेत नाशिकला महत्त्वाचे स्थान! राज्यातील 360 जणांच्या यादीत 29 जण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com