125 ज्येष्ठ नागरिकांचा 1 जूनला वाढदिवस साजरा करणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव

125 senior citizens birthday celebrated
125 senior citizens birthday celebratedesakal

आराई (जि. नाशिक) : युवकांना अनेक नवनवीन कल्पना सुचत असतात. अशीच एक सामाजिक बांधिलकी जपणारी चांगली कल्पना आणि एक आदर्शवत कार्यक्रम बागलाण तालुक्यातील आराई येथील अश्विन अहिरे यांच्या संकल्पनेतून साकार केला. जिल्ह्यात हा आगळावेगळा कार्यक्रम घेऊन तालुक्यात चर्चेचा विषय बनला १ जून हा सर्वात जास्त वाढदिवस (Birthday) साजरा होणारा दिवस. या दिवशी प्रत्येक गावी तरुण आपला वाढदिवस आपल्या मित्रांसोबत मोठ्या उत्साहात साजरा करतात. (125 senior citizens Birthday celebrated on 1st June in aarai village Nashik News)

युवकांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेरणादायी असा भव्य कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित करून अनोख्या पद्धतीने १२५ लोकांचा वाढदिवस साजरा करत त्यांच्या आनंदात भर घातली. १ जून ही जन्मतारीख बऱ्याच लोकांची असल्याने अश्विन अहिरे यांनी ५१ वर्षांपुढील नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्याच्या संकल्पनेतून कोणतेच राजकारण व भेदभाव न करता सर्वांना फेटा बांधून व गावाच्या प्रवेशापासून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात येऊन भव्य मंडपात सर्व ज्येष्ठांचे औक्षण करण्यात आले. कार्यक्रमास तरुणाईही सहभागी झाली होती.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दहा किलोचा केक कापून मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला. कसमादे परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात आराई गावातील १२५ ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस प्रथमच साजरा झाला. कार्यक्रमास उपस्थित जेष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून दिसत होता. आजपर्यंत आमचा वाढदिवस कोणीच साजरा केला नाही. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच वाढदिवस साजरा झाला, अशा भावना ज्येष्ठांनी बोलून दाखविल्या.

125 senior citizens birthday celebrated
मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी भीषण अपघात; 3 जण जागीच ठार

"सर्व समाजातील लोकांना एकत्रित करून ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसला. जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळावी व त्यांच्या उर्वरित आयुष्यात उत्साह वाढवा हाच या कार्यक्रमाचा हेतू होता." - अश्विन आहिरे, सामाजिक कार्यकर्ते,आराई

"आजपर्यंत माझा वाढदिवस साजरा केला नव्हता. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा वाढदिवस साजरा करण्यात आला हा आनंद कधीच विसरणार नाही."

- राजेंद्र आहिरे, ज्येष्ठ नागरिक.

125 senior citizens birthday celebrated
Nashik : अक्षयची आईला IPS पदाची अनोखी भेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com