नाशिक- मेच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा प्रशासनात मोठ्या प्रमाणात खांदेपालट झाली आहे. प्रशासनाने शनिवारी (ता. ३) सुटीच्या दिवशी रात्री उशिराने तब्बल १२८ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांसह वर्षानुवर्षापासून एकाच तालुक्यात नियुक्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने अन्य तालुक्यांचा रस्ता दाखविला आहे.