Nashik News: येवल्यासह तालुक्यात 13 नवे रेशन दुकाने

ration shop
ration shopesakal
Updated on

Nashik News : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तालुक्यात १३ गावांत नव्याने स्वस्त धान्य दुकाने होणार आहेत यासाठी तहसिल कार्यालयाकडून अकार्यान्वित दुकानासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. (13 new ration shops in Taluka including yeola Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ration shop
Ration Shop License: रास्तभाव दुकान परवान्यासाठी आवाहन

तालुक्यातील सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आतापर्यंत रद्द असलेली,राजीनामा दिलेली, नवीन प्रस्तावित व इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या १३ अकार्यान्वित रास्त भाव दुकान दुकानासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांच्या सूचनेनुसार तहसीलदार आबासाहेब महाजन यांनी दिली.

शहरातील पाच तसेच तालुक्यातील दहेगाव पाटोदा,न्याहारखेडे बु., पिंपळगाव जलाल, देवदरी, धनकवाडी, भिंगारे, गुजरखेडे, पिंपळगाव लेप अशा एकूण १३ नवीन रास्त भाव दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अर्ज परिपूर्ण भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसील कार्यालय येवला येथे समक्ष ३१ जुलैपर्यत सीलबंद पाकिटात सादर करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही असे तहसीलदार महाजन यांनी सांगितले.

ration shop
Ration Shop Banking Facility : जिल्ह्यातील 1300 दुकानांतून मिळणार बँकिंग सेवा; रेशनदुकानदारांना आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.