Latest Crime News | तपोवनात 13 वाहनांच्या काचा फोडल्या; दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vehicles vandalized by miscreants in the area at midnight.

Nashik Crime : तपोवनात 13 वाहनांच्या काचा फोडल्या; दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

पंचवटी (जि. नाशिक) : काही समाजकंटकांनी तपोवन रोड भागातील सर्व्हिस रोडवरील गॅरेजमधील जवळपास ११ ते १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. येथील सर्व गॅरेजधारकांतर्फे आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गॅरेजमालकांकडून पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांचा शोध सुरू आहे. (13 windows of vehicles broken by criminals in Tapovan Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Crime Update : लाचखोर इंजिनिअर अधिकारी LCBच्या ताब्यात

मुंबई-आग्रा महामार्गावरील औरंगाबाद नाका ते तपोवन सर्व्हिस रोडवर चारचाकी व अवजड वाहने दुरुस्तीचे गॅरेज आहेत. यापैकी तीन ते चार गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी पार्क केलेल्या अवजड व काही चारचाकी वाहनांच्या काचा शनिवारी (ता. १५) रात्री एक ते दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी फोडल्या.

एका गॅरेजवरील एका वॉचमनलाही मारहाण करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजवरून दहशत निर्माण करण्याचा दृष्टीने हा प्रकार झाल्याचे आढळून येत आहे. यात टेम्पो ट्रॅव्हलर, ट्रक व इतर चारचाकी ११ ते १३ गाड्यांचे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी केली दूर भीती

या घटनेचे वृत्त आडगाव पोलिस ठाण्यास समजताच गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गॅरेज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविले. गाडीच्या काचा फोडल्या प्रकरणी सायंकाळी पाचपर्यंत गॅरेजचालक गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. मात्र, आडगाव पोलिसांनी गॅरेजचालक- मालकांची समजूत काढत, मनातील भीती दूर केली. त्यांनतर तेथील गॅरेजचालक व मालक गुन्हा दाखल करण्यास तयार झाले.

हेही वाचा: Nashik Crime News : 2 कारमधून अवैध मद्याची वाहतूक