Latest Marathi News | 2 कारमधून अवैध मद्याची वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime News

Nashik Crime News : 2 कारमधून अवैध मद्याची वाहतूक

नाशिक : ऐनसणासुदीच्या काळात अवैध मद्याची वाहतूक वाढल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात केलेल्या नाकाबंदीमध्ये अंबोली फाटा शिवार आणि तोरंगण शिवारात कारवाई केली. यात दोन कारमधून अवैधरीत्या मद्याची वाहतूक केल्याची समोर आले असून, सुमारे २२ लाखांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध मद्यवाहतुकीला आळा घालण्यासाठी सीमावर्ती भागात गस्ती पथके तैनात केली आहेत. शुक्रवारी (ता.१४) गस्ती पथक त्र्यंबकेश्वर परिसरात गस्ती सुरू असताना अंबोली फाटा व तोरंगण शिवारातून अवैधरीत्या मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती.(Illegal Liquor Transport from Cars investigation under Bharari State Excise Department Nashik Crime News)

हेही वाचा: Crime News Jalgaon : विद्यार्थ्याने केली शाळेच्या आवारातच शिक्षकास मारहाण

त्यानुसार पथकाने अंबोली फाटा येथे किया कंपनीची सेल्टोस कार (जीजे २१ सीसी ३८३१) तर, तोरंगण शिवारात स्विफ्ट कार (जीजे २१ एक्यू ७६५९) या वाहनांची तपासणी केली. या कारमध्ये अवैधरीत्या मद्यसाठा मिळून आला.

सदरील मद्य हे दादरा नगर हवेली या ठिकाणी व्रिकीस मान्यता असून महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे. संशयित कारचालक अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या प्रकरणी पथकाने दोन्ही वाहनांसह २२ लाख १२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई एक्साईजचे उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक एकचे निरीक्षक जे. एस. जाखेरे, दुय्यम निरीक्षक आर.व्ही. राऊळ, आर. सी. केरीपाळे, सुनील दिघोळे, श्याम पानसरे, धनराज पवार, राहुल पवार, महेंद्र भोये यांनी केली. दुय्यम निरीक्षक आर.व्ही. राऊळ, आर.सी. केरीपाळे हे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Eknath Khadse Statement : ऐनकेन प्रकारे गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचे षडयंत्र

टॅग्स :Nashikcrimecar