Suspend News
Suspend Newsesakal

Nashik News : जिल्ह्यातील 130 आधार operatorनिलंबित

Published on

Nashik News : युआयडीआयच्या नियमावलीतील नियमित बदलाने जिल्ह्यातील १३० आधार ऑपरेटर सस्पेंड करण्यात आले आहे. यामुळे आधारमधील दुरुस्ती, पाच वर्षांतील नोंदणी होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नेहमी आधार केंद्रचालक युआयडीआयच्या अद्ययावत नियमानुसार वेगवेगळ्या प्रकारे दस्तावेज बदलाचे नियम होत असल्याने ऑपरेटर व आधार नूतनीकरण नागरिकांत संघर्ष वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. (130 Aadhaar operators suspended in district Effects on Centers of Not Observing New Information Nashik News)

आधार केंद्रावर पाच ते १८ वयोगटातील नवगतांचे आधार काढताना अनेक दस्तावेजांचा सामना करावा लागत आहे. अनेक केंद्र बंद झाल्याने नागरिकांची सद्या परवड सुरू आहे. विद्यार्थी व लग्न झालेले नवीन जोडपे यांच्या आधारकार्डमध्ये अपडेट करणे, त्रुटी दूर केल्याशिवाय शालेय प्रवेश अथवा शासकीय सुविधा मिळणे कठीण व गैरसोयीचे झाले आहे.

आधारमधील नियमित बदल हे करण्यापूर्वी युआयडीने सक्रिय ऑपरेटरला मेलवर माहिती देणे गरजेचे आहे. यामुळे ऑपरेटरला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

Suspend News
Nashik 11th Admission : अकरावी प्रवेशासाठी 22 हजार विद्यार्थ्यांचे नोंदणी

पूर्वी आधार अद्ययावत करणे शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या सहीने बदल होत होता, मात्र आधार अद्ययावत यादीमधून नाव वगळल्याने आदिवासीचे जन्म दाखले नसल्याने अडचणीत भर पडली आहे.

जन्म तारीख व दुरुस्तीत कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. आधार कामकाज गतिमान होणे गरजेचे आहे. अनेक ऑपरेटर यांनी परीक्षा देऊन पंधरा दिवस ओलांडून देखील त्यांना अजून अधिकृत करण्यात आलेले नाही.

जन्म, स्पेलिंग, नाव दुरुस्ती करिता सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे झाले आहे. युआयडीच्या नवीन सर्कल नुसार ऑपरेटर यांना पुन्हा परीक्षा पास करावी लागणार आहे.

Suspend News
Nashik Agriculture News : जिल्ह्यात 1 लाख टन खतसाठा पडून; बियाणे खरेदीकडेही शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com