Nashik Crime : येवला तालुका पोलिसांकडून 14 किलो गांजा जप्त; राहाता येथील 4 संशयितांना अटक

तालुका पोलिसांनी सावरगाव शिवारात माहितीच्या आधारे सापळा रचून रविवारी (ता. ४) मध्यरात्री कारमधून १४ किलो गांजा जप्त केलाव चार संशयितांना अटक केली.
Police teams up with suspected marijuana smugglers
Police teams up with suspected marijuana smugglers esakal

येवला : तालुका पोलिसांनी सावरगाव शिवारात माहितीच्या आधारे सापळा रचून रविवारी (ता. ४) मध्यरात्री कारमधून १४ किलो गांजा जप्त केलाव चार संशयितांना अटक केली. (14 Kg Ganja seized by Yeola Taluka Police 4 suspects arrested from Rahata Nashik Crime)

नगर-मनमाड राज्य महामार्गावर मनमाडकडून कारमधून अवैध गांजाची तस्करी करणार असल्याची माहिती तालुका पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना मिळाली होती. त्यावरून तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी सावरगाव शिवारातील गोपाळवाडी फाटा येथे सापळा रचला.

मनमाडकडून अहमदनगरच्या दिशेने येत असलेली इर्टिका कार (एमएच ०५, बीएस ४४१०) येताना दिसली. संशयित कार असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी कार थांबवून झडती घेतली असता, त्यात प्लॉस्टिक दोन गोण्यामध्ये सुमारे ९८ हजार रुपयांचा १४ किलो गांजा मिळून आला.

Police teams up with suspected marijuana smugglers
Mumbai Crime: मुलुंडमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये होत आहे वाढ !

पोलिसांनी कारसह एकूण पाच लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारचालक सनी कारभारी भातकुटे (वय ३७, रा. ब्राहमण गल्ली, दत्त मंदिराजवळ, राहाता, जि. नगर), अशोक ऊर्फ अक्षय राजू पगारे (२७, रा. साई कॉलनी, रांजणगाव रोड, राहाता) समीर आक्रम शेख (२६, मुळ रा. मोमीनपुरा, एक मिनार मशीद बीड, ह. मु. बर्फाच्या कारखान्याजवळ इस्लामनगर, शिर्डी), प्रशांत जनार्दन जाधव (२२, साई कॉलनी, रांजणगाव रोड, राहाता) यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता गिरी तपास करीत आहेत.

पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, मालेगाव विभागाचे अप्पर अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, परिक्षेत्र उपनिरीक्षक रामहरी खेडकर, हवालदार ज्ञानेश्वर हेबाडे, सचिन वैरागर, आबा पिसाळ, गणेश बागूल, मुकेश निकम, संदीप दराडे, श्‍याम थेटे यांनी ही कारवाई केली. संशयित अक्षय पगारे याच्याविरोधात राहता पोलिस ठाण्यात वेगवेगळे सहा गुन्हे, समीर शेख याच्याविरोधात तीन, तर प्रशांत जाधव याच्याविरोधात एक गुन्हा यापूर्वी दाखल असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.

Police teams up with suspected marijuana smugglers
Ahmednagar Crime: रक्षकच बनले भक्षक! अहमदनगरमधील धक्कादायक घटना, पोलीस शिपाई आणि होमगार्डकडून महिलेवर अत्याचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com