नाशिक- नाशिक शहरातील संशयिताने त्याचा वाईन शॉपचा परवाना विक्री करण्याचे आमिष दाखवून नागपूरच्या व्यावसायिकाला तब्बल १ कोटी ४२ लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात वाईन शॉपचा परवाना असलेल्या संशयितासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.