नाशिक जिल्‍ह्यात आज १५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्‍ह

corona
coronagoogle

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणारे व दैनंदिन कोरोनामुक्‍त रुग्‍णसंख्या एकसारखी राहत आहे. त्‍यामुळे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्याही स्‍थिरावली आहे. गुरुवारी (ता. १७) जिल्‍ह्यात १५८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर १६३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. चार बाधितांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. यातून सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात तीन हजार ४७७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 158 new corona cases and 4 deaths registered in nashik district

गुरुवारी नाशिक महापालिका क्षेत्रात १२२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर नाशिक ग्रामीणमधील ३९, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक, जिल्‍ह्याबाहेरील सहा रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. दुसरीकडे जिल्‍ह्यात १६३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वी मात केली. जिल्‍ह्यात झालेल्‍या चार मृत्‍यूंपैकी तीन नाशिक ग्रामीणमधील, तर एक नाशिक महापालिका क्षेत्रातील आहे.

सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार १०६ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील सर्वाधिक ६४२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. मालेगावच्‍या ३१५, नाशिक शहरातील १४९ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५०९ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ४६५ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये ३०, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात १२ रुग्‍ण दाखल झाले.

corona
नाशिक शहरात १५१ घरे अतिधोकादायक

पोर्टलवर १०३ मृत्‍यू अपलोड

गुरुवारी पोर्टलवर १०३ मृतांची नोंद झाली. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ८०, नाशिक ग्रामीणमधील २२, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एका मृताचा समावेश आहे.

corona
कोरोनामुळे लांबला नाशिक मेट्रोचा प्रवास!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com