Nashik News : वर्षभरात 168 पक्ष्यांना नायलॉन मांजाचा फास! चोरीछुपे आजही होतेय मांजाची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

An owl rescued from a nylon net by the fire department

Nashik News : वर्षभरात 168 पक्ष्यांना नायलॉन मांजाचा फास! चोरीछुपे आजही होतेय मांजाची विक्री

जुने नाशिक : वर्षभरात नायलॉन मांजाच्या फासातून अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे १६८ पक्ष्यांची सुटका केली. त्यातील तीन कावळ्यांचा मृत्यू झाला, तर सुमारे ३० पक्षी जखमी झाले. मांजात अडकणाऱ्या पक्ष्यांमध्ये सर्वाधिक कावळ्यांची होती. तर, त्या पाठोपाठ कबुतरांना फास लागण्याची घटना घडली. (168 birds snared with nylon nets in year Even today nylon manja sales selling secretly Nashik News)

धोकादायक नायलॉन मांजा विक्री, तसेच बाळगण्यास प्रशासनाकडून बंदी आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजा विक्री झाला आहे. नागरिकांकडूनदेखील वापर करण्यात आला. त्यामुळे यंदाही पक्षी, नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे. व्यक्तींची संख्या जरी कमी असली तरी पक्ष्यांची संख्या मात्र अधिक आहे.

जानेवारी महिन्यात ५२ पक्ष्यांना नायलॉन मांजाचा फास लागण्याची घटना घडली होती. त्यात एका पक्ष्याचा मृत्यू झाला. अन्य पक्ष्यांची अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्‍यांकडून सुटका करण्यात आली. त्यांना उपचारार्थ पक्षी मित्रांच्या ताब्यात देण्यात आले. आकडेवारीचा विचार केला तर दैनंदिन एक किंवा दोन पक्षी नायलॉन मांजात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत.

काही नागरिकांचेदेखील हात, गळा, पाय चिरण्याच्या घटना समोर आल्या आहेत. स्थानिक स्तरावर कारवाई करण्यापेक्षा नायलॉन मांजा तयार होणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई करणे आवश्यक आहे. जर उत्पादनच झाले नाही तर मांजा विक्रीस येणार कसा, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik News: भारत्तोलन स्पर्धेत मुकुंद आहेरला सुवर्णपदक; 4 राष्ट्रीय विक्रम करणारा राज्यातील पहिलाच खेळाडू!

दुसरीकडे अग्निशामक विभागाच्या सतर्कतेमुळे १६५ पक्ष्यांचे प्राण वाचले. सध्याही नायलॉन मांजा विक्री होत असल्याने पक्ष्यांना मांजाचा फास लागण्याच्या घटना घडत आहे. पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरवात केली असली तरी चोरीछुपे आजही नायलॉन मांजाची विक्री होत आहे. गेल्या वर्षी अर्थात २०२१ मध्ये १७६ पक्ष्यांना फास लागण्याची घटना घडली होती. तर या वर्षी २४ डिसेंबरपर्यंत फास लागलेल्या पक्ष्यांची संख्या १६८ झाली आहे.

नायलॉन मांजाचा फास लागलेले पक्षी

पक्षी संख्या

बगळा ०३
पारवा ०५
कबुतरे ३९
घार १९
कोकिळा १०
वटवाघूळ ०६
कावळे ६२
घुबड ११
माळढोक ०१
करकोचा ०३
मोर ०१
भारद्वाज ०१
साळुंकी ०१
पोपट ०३
चिमणी ०२
विदेशी ०१
मृत ०२

हेही वाचा: MUHS Authority Election 2023 : विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीच्या प्राथमिक मतदार याद्या जाहिर