MUHS Authority Election 2023 : विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीच्या प्राथमिक मतदार याद्या जाहिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MUHS latest marathi news

MUHS Authority Election 2023 : विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीच्या प्राथमिक मतदार याद्या जाहिर

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण व अभ्यासमंडळावरील सदस्य निवडीकरीता निवडणूकीच्या अनुषंगाने ‘प्राथमिक मतदार’ याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आल्या आहेत. (MUHS Authority Election 2023 Primary Voter List of University Authority Election Published nashik news)

विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिनियमात निर्देशित केल्यानुसार विद्यापीठ अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यासमंडळावरील सदस्य यांच्या निवडीकरीता प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येते.

त्याव्दारा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील मान्यताप्राप्त शिक्षकांतून विद्यापीठ प्राधिकरण सदस्यांची निवडणूक प्रक्रियेव्दारे निवड करण्यात येते. यासाठी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने प्राथमिक मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. सदर मतदार याद्या विद्यापीठाचे www.muhs.ac.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik News : पोलीस आयुक्तालयाच्या विस्ताराची प्रतिक्षा; CCTVचे जाळे रखडले!

विद्यापीठाकडून प्रसिध्द प्राथमिक मतदार यादीतील हरकती असल्यास दि. 03 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यापीठाकडे ई-मेलव्दारा अथवा विद्यापीठाचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व लातूर येथील विभागीय केंद्रात लेखी स्वरुपात पुराव्याचे कागदपत्रांसह नोंदवू शकतात.

याबाबत अधिक माहिती व सूचना विद्यापीठाचे निदेश क्र. 10/2017 मध्ये नमुद करण्यात आले आहेत. विहित वेळेत प्राप्त हरकतींवर मा. कुलगुरु यांचे समक्ष सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीचा निर्णय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यसात येईल. मा. कुलगुरु यांनी घेतलेला निर्णय अंतीम व बंधनकारक राहिल.

विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक वेळापत्रक व अंतीम मतदार याद्या मा. कुलगुरु महोदया यांच्या सुनवणीनंतर स्वतंत्र्यरित्या जाहिर करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यापीठ निवडणूक कक्षास 0253-2539151 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

हेही वाचा: YIN Election : 'यिन’ निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद