
Tree Cutting Crime : अनधिकृत वृक्षतोड प्रकरणी 17 गुन्हे दाखल
नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वृक्षतोड सुरू असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने राबविलेल्या मोहिमेत सहा विभागात १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अनधिकृतपणे वृक्ष तोडणाऱ्यांकडून २३ लाख ७१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
१ फेब्रुवारीपासून आकडेवारी पाहता मनपाचे सहा विभाग मिळून एकूण १७ गुन्हे दाखल झाले आहेत. (17 cases have been registered in case of unauthorized tree cutting nashik news)
अनधिकृतपणे वृक्ष तोडणाऱ्यांकडून २३ लाख ७१ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. सर्वाधिक सहा गुन्ह्यांची नोंद पश्चिम विभागात झाली असून एकूण ६ लाख ६५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.
पंचवटी विभागात सर्वात कमी एक गुन्हाची नोंद झाली असून, एक लाख ७५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. मनपाच्या पथकाने १२ मार्चला सातपूर विभागातील आनंदवली शिवारात ४५ फूट उंचीचे गुलमोहराचे डेरेदार झाड तोडून लाकूड घेऊन जाणारे वाहन मोठ्या शिताफीने पकडले होते.
त्यातील दोन टन वजनाचा लाकूडफाटा पथकाने ताब्यात घेतला आहे. उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष प्राधिकरण निरीक्षक किरण बोडके, आर. बी. सोनवणे, वैभव वेताळ, जगदीश लोखंडे, मुख्य माळी श्रीकांत इरनक यांचा सहभाग असलेल्या पथकाने ही कारवाई केली होती.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
विभागनिहाय गुन्ह्यांची संख्या व दंड
पश्चिम ६ गुन्हे- ६ लाख ६५ हजारांचा दंड
पंचवटी १ गुन्हा - एक लाख ७५ हजारांचा दंड
नवीन नाशिक - २ गुन्हे – ३ लाख ३५ हजारांचा दंड
नाशिक पूर्व - ४ गुन्हे – २ लाख ७१ हजारांचा दंड
सातपूर - २ गुन्हे – ३ लाख ४० हजारांचा दंड
नाशिक रोड - २ गुन्हे – ५ लाख ८५ हजारांचा दंड
एकूण - १७ गुन्हे - २३ लाख ७१ हजारांचा दंड