नाशिक- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १८२ कोटींच्या अनियमिततेप्रकरणी बुधवारी (ता. ७) झालेल्या सुनावणीत माजी संचालकांनी आपली लेखी, तसेच तोंडी बाजू सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यापुढे मांडली. सुनावणी पूर्ण झाली असून, आता थेट निकाल देण्यात येणार आहे.