
नाशिक : शहर परिसरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी तब्बल चार लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. द्वारका परिसरातील घरफोडीत पावणे तीन लाखांचा तर, उपनगर हद्दीत भरदिवसा घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. (2 burglaries in city 4 lakh stolen Nashik Latest Crime News)
द्वारका परिसरातील हॅपी होम कॉलनीमध्ये बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी २ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. युशा अल्ताफ मोमीन (सध्या रा. स्टोन फ्लॉवर टॉवर, ठाणे रोड, भिवंडी. मूळ रा. अथर्व बंगला, हॅपी होम कॉलनी, द्वारका) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या १० ते १४ तारखेदरम्यान त्यांचे घर बंद होते.
यादरम्यान, अज्ञात दोघा चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप, कडी कोयंडा तोडून प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून २ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात २५ हजारांची रोकड, ९० हजारांची सोन्याची अंगठी, ७५ हजार रुपयांची अंगठी, ९० हजारांची अंगठी असा ऐवज आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी घरात सीसीटीव्ही बसविलेले असल्याने त्याची माहिती त्यांना झाल्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलिसात अज्ञात दोघांविरोधात फिर्याद दिली.
याप्रकरणाचा उपनिरीक्षक बी.पी. गिते हे तपास करीत आहेत. दुसरी घरफोडीची घटना उपनगरच्या पिंटो कॉलनीत झाली. दीपाली दत्तात्रय जगताप (रा. गजानन स्पर्श अपार्टमेंट, पार्वतीबाई नगर, पिंटो कॉलनी, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या मंगळवारी (ता. १५) दुपारी त्यांच्या मुलीसोबत घराला लॉक करून व्यापारी बँकेत कामानिमित्ताने गेल्या होत्या.
या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडीकोयंडा कशाने तरी उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून १५ हजारांचे सोन्याचे वेढणी, ३४ हजार ५०० रुपयांची सोन्याचे कानातील टॉप्सचे तीन जोड, १८ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, ३ हजार रुपयांचे सोन्याचे पेंडल असा ७० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक बटुळे हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.