Nashik News : वृक्षतोड प्रकरणी 2 गुन्हे दाखल

Tree Cutting
Tree Cuttingesakal

जुने नाशिक (जि. नाशिक) : महापालिकेची परवानगी न घेता वृक्षतोड केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात पश्चिम विभागातर्फे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्रंबक सिग्नल परिसरात पहिली घटना घडली. तर, दुसरी घटना गंजमाळ पंचशीलनगर येथे घडली. (2 cases registered for cutting trees without taking permission of NMC nashik News)

पहिल्या घटनेत २२ जानेवारीला त्र्यंबक सिग्नल परिसरात ओम सर्व्हिस स्टेशन पेट्रोलपंप आवारात वृक्षतोड केल्याची घटना घडली. येथील पिंपळाच्या झाडाची अनधिकृतरीत्या छाटणी करत विस्तार कमी करण्यात आला.

उद्यान निरीक्षक किरण बोडके यांना पाहणी केली. वृक्षाचा विस्तार कमी केल्याचे आढळून आले. सर्व्हिस स्टेशनच्या संचालिका प्रितु जैन यांनी परवानगी घेतली नसल्याने कारवाई करत त्यांना नोटीस बजावण्यात आली. शिवाय दंडाची रक्कम भरण्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Tree Cutting
Nashik Crime News : टाकळीला घरातून मागुर मत्स्य साठा जप्त

त्याचप्रमाणे दुसरी घटना २९ जानेवारीला पंचशीलनगर गंजमाळ येथे घडली. मयूर गॅस एजन्सी येथील पिंपळाचे वृक्ष बुंध्यापासून तोडले होते. एजन्सी चालक मौलिक शहा यांनीदेखील परवानगी घेतली नसल्याने श्री. बोडके यांनी त्यांच्यावर कारवाई करत दंडाची रक्कम भरण्यासंदर्भात नोटीस बजावली.

त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिल्याने एजन्सीच्या बाहेर नोटीस चिटकविण्यात आली. दोघांकडून अद्यापही दंडाची रक्कम भरली गेली नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार गुरुवार (ता.२) दोघांविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tree Cutting
Sanskrit Rajya natya Spardha : संस्कृत राज्य नाट्यस्पर्धेची सांगता; 15 एकांकिकांचे सादरीकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com