Latest Marathi News | Cheque Bounce : धनादेश न वटल्याप्रकरणी अडीच लाखांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cheque bounced News

Cheque Bounce : धनादेश न वटल्याप्रकरणी अडीच लाखांचा दंड

नाशिक : शहरातील एका पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जप्रकरणी परतफेडीसाठी दिलेला धनादेश वटला नाही. याप्रकरणी पतसंस्थेने जिल्हा न्यायालयात दावा दाखल करीत दाद मागितली असता, न्यायालयाने संशयित कर्जदाराला २ लाख ६३ हजारांचा दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. गणेश सिन्नरकर असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. (2 half lakh fine for non cashing of cheque Nashik News)

हेही वाचा: Nashik Crime : सिडकोमध्ये टोळक्याकडून तरुणाचा पाठलाग; दहशत माजविण्याचा प्रयत्न

नाशिकमधील गोळे कॉलनीत श्री परशुराम नागरी सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेकडून आरोपी गणेश सिन्नरकर यांनी कर्ज घेतले होते. सदरील कर्जाची परतफेड करण्यासाठी आरोपी सिन्नरकर यांनी धनादेश दिले होते. पतसंस्थेकडे दिलेले धनादेश न वटल्याने पतसंस्थेच्या जयश्री कुलकर्णी यांनी नाशिक न्यायालयात दावा दाखल केला होता.

याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. ग.म. कोल्हापुरे यांच्यासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने सिन्नरकर यास २ लाख ६३ हजार रुपयांचा दंड आणि ३ महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणात पतसंस्थच्या वतीने ॲड. जयदीप वैशंपायन, ॲड. प्रणव परशुरामी, ॲड. सचिन ढेपले यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा: Traffic Changes : देवींचे विसर्जन, रावण दहनामुळे वाहतूक मार्गात हे आहेत बदल