Bribe Crime News
Bribe Crime Newsesakal

Bribe Crime : कळवण प्रकल्पातील 2 कनिष्ठ लिपिक निलंबित

Published on

नाशिक : दहा हजाराची लाच स्वीकारल्याचे प्रकरण घडल्यानंतर कळवण प्रकल्प अधिकारी विकास मीना ॲक्शन मोडवर आले असून कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कार्यालयातील दोघा कनिष्ठ लिपिक यांचे निलंबन केले आहे. यासह लाचखोर प्रताप वडजे यांच्यावर देखील निलंबन करण्यात आली आहे. (2 junior clerks suspended in Kalwan project Nashik Latest Marathi Bribe Crime news)

स्वयंपाकी म्हणून नियुक्तीपत्र देण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारताना कळवण प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप वडजे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.

या कारवाईनंतर आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून देखील या बाबत प्रकल्प अधिकारी यांना विचारणा करण्यात आली होती. यानंतर प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी या प्रकरणात दोषी असलेल्या कनिष्ठ लिपिक हेमंत भोये व जगन उबाळे यांना निलंबित केले आहे.

Bribe Crime News
‘YCMOU’च्‍या प्रवेशासाठी 15 सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ

सदर प्रकरणात सदरचे नियुक्तीपत्र हे जावकचे कनिष्ठ लिपिक यांच्याकडे त्यांनी ते संबंधित यांना देणे अपेक्षित असताना देखील तक्रारदार यांच्या पत्नीचे नियुक्तिपत्र हे प्रताप वडजे यांच्याकडे गेल्याने यातील दोघा लिपिकांना निलंबित करण्यात आलेले आहे.

वडजेनी राखून ठेवले नियुक्तीपत्र

तक्रारदार यांच्या पत्नी यांना स्वयंपाकी म्हणून नियुक्ती देण्याच्या आदेशावर प्रकल्प अधिकारी यांनी दहा ते बारा दिवस अगोदरच स्वाक्षरी केली असताना देखील कार्यालयातून नियुक्तीपत्र हे संबंधित यांना देण्याऐवजी ते वडजे यांनी लाचेच्या लोभापोटी आपल्याकडेच ठेवले होते. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी या प्रकरणात वडजेंना लाच घेताना अटक झाली.

Bribe Crime News
Ganeshotsav 2022 : निर्बंधमुक्त गणेशोत्सवाने 2 वर्षानंतर वादकांचे विघ्न दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com