Latest Marathi News | Ganeshotsav 2022 : निर्बंधमुक्त गणेशोत्सवाने 2 वर्षानंतर वादकांचे विघ्न दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

On occasion of Ganeshotsav Bappa's arrival procession, musicians playing drums

Ganeshotsav 2022 : निर्बंधमुक्त गणेशोत्सवाने 2 वर्षानंतर वादकांचे विघ्न दूर

जुने नाशिक : यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सवाने (Ganeshotsav) वाद्यांचे आणि वादकांचे विघ्न हटले आहे. तब्बल दोन वर्षानंतर संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या नाशिक ढोल, डोली बाजा यासह अन्य वाद्यांचा दणदणाट बुधवारी (ता. ३१) सर्वांना अनुभवास मिळाला.

गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने नाहीच्या प्रमाणात साजरा झाला. कोरोनामुळे असलेल्या अनेक निर्बंधामुळे वाद्यांच्या वादकांवरदेखील मोठा परिणाम झाला. गणेश स्थापनेला तर नाहीच नाही, परंतु गणेश विसर्जन मिरवणूकदेखील दोन्ही वर्ष रद्द करण्यात आल्याने वादकांच्या हाताला वाद्यांचे काम मिळू शकले नाही. (Ganeshotsav 2022 unrestricted Ganeshotsav after 2 years Dhol Pathak problems Solved Nashik Latest Marathi News)

लग्न सराईतही त्याची परवानगी नसल्याने वादकांवर उपासमारीची वेळ आली होती. वाद्य वाजवण्याच्या त्यांच्या कलेला विघ्न लागले होते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त गणरायाने त्यांचे ते विघ्न हरले. लहान- मोठ्या मंडळांपासून, तर घरगुती मंडळांनी वाद्य वाजवत ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले.

काही ठिकाणी तर मंडळांना आणि नागरिकांना वाद्याच्या पथकाची कमतरता भासली. ढोल- ताशे वाजविणारे मिळत नसल्याने केवळ बाप्पाच्या जयघोषात आगमन करून घेतले. शहरभर ढोल ताशे, डोली बाजा तसेच अन्य वाद्यांचा दणदणाट ऐकावयास मिळाला. नागरिक वाद्याच्या तालावर थिरकताना दिसले.

हेही वाचा: Nashik : विसर्जनासाठी विनामूल्य 'Ammonium bicarbonate powder'

काही मोठ्या मंडळांनी तर आपल्या भव्य दिव्य बाप्पाची मिरवणूक उत्सवाच्या काही दिवस अगोदरच काढली. तीही ढोल पथकांच्या तालावर. इतकेच नाही तर आगामी विसर्जन मिरवणूकही निर्बंधमुक्त असल्याने मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळात ढोल ताशांच्या पथकाचा सहभाग असणार आहे.

मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसर दणाणून जाणार आहे. काही वर्षांपूर्वीची जोरदार मिरवणूक या वर्षी पुन्हा नागरिकांना अनुभवास मिळणार आहे. यानिमित्त बहुतांशी मंडळांनी आत्तापासूनच ढोल पथकांसह अन्य वाद्यांची बुकिंग करून ठेवली आहे.

आता वादकांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे, ती केवळ मिरवणूक सोहळ्याची. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीत वाद्यांच्या पथकाची होणारी मागणी लक्षात घेता त्यांचे गेल्या दोन वर्षातील नुकसान भरून निघणार आहे. शिवाय त्यांच्यावर उडालेले उपासमारीचे विघ्न दूर होणार आहे.

हेही वाचा: ‘YCMOU’च्‍या प्रवेशासाठी 15 सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ

Web Title: Ganeshotsav 2022 Unrestricted Ganeshotsav After 2 Years Dhol Pathak Problems Solved Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..