esakal | नाशिक ऑक्सिजन गळती : केंद्र सरकारकडून मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik oxygen leakage Accident

नाशिक ऑक्सिजन गळती : केंद्र सरकारकडून मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे मृत्यू पावलेल्या २४ नागरिकांच्या वारसांना केंद्र शासनाने प्रत्येकी दोन लाख रुपये, तर गंभीर रुग्णांना ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेकडून मृतांची यादी मागविली आहे.

बुधवारी (ता. २०) महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या ४६ रुग्णांना ऑक्सिजन मिळाला नाही. यातील २४ रुग्ण जागेवर मृत झाले. या घटनेची राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिल्या आहेत. राज्य शासनाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये, तर महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांनी मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले. एकूण दहा लाख रुपये मृतांच्या वारसांना मिळणार असून, त्यात आता केंद्र सरकारच्या मदतीची भर पडणार आहे. केंद्र शासनाने प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत मृतांच्या वारसांना जाहीर केली आहे, तर गंभीर रुग्णांना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, महापालिकेला पत्र पाठवून दुर्घटनेत मृत झालेल्या रुग्णांची यादी मागविली आहे.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

loading image