Phule Karj Mukti Yojana : फुले कर्जमुक्ती योजनेच्या अनुदानापासून राज्यामधील 2 लाख शेतकरी वंचित

Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme latest marathi news
Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme latest marathi newsesakal

Phule Karj Mukti Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदानापासून दोन लाख शेतकरी अजून वंचित आहेत.

७४० कोटी रुपयांच्या वितरणाला अद्याप वित्त विभागाने मान्यता दिलेली नसल्याने अजून प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही. (2 lakh farmers in state are not get Phule Debt Relief Yojana subsidy nashik news)

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार होते. मात्र ते शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे का? असा प्रश्‍न सत्यजित तांबे यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला.

सरकारने कोणती कार्यवाही व उपाययोजना केली अथवा करण्यात येत आहे? त्याच्या विलंबाची कारणे काय आहेत? असेही प्रश्‍न श्री. तांबे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme latest marathi news
Farmers Debt Relief Scheme : फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 57 हजार शेतकऱ्यांना लाभ; सविस्तर जाणून घ्या

श्री. तांबे म्हणाले, की २०१७-२०१८, २०१८-२०१९ व २०१९-२०२० या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीककर्जाची उचल करून शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.

योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या नियम व अटी जाचक असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळत नाही. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात ७१ हजार २१८ ऑनलाइन करण्यात आलेल्या कर्जखात्यांपैकी ३५ हजार ५०३ शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. ३५ हजार ७१५ कर्जखाती अनुदानापासून अजूनही वंचित आहेत.

Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme latest marathi news
Taking Loans : आता नव्या घरासाठी नाही,गाडीसाठी नाही तर लोक कर्ज घेत आहेत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com