Nashik Crime News : शहरात गोवंश पिकअपसह सव्वादोन लाखाचा ऐवज जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : शहरात गोवंश पिकअपसह सव्वादोन लाखाचा ऐवज जप्त

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील मोती हायस्कूल येथे कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी छापा टाकून पिकअप मध्ये आणलेले ११ गोवंश जातीचे जनावरे व पिकअपसह (एमएच ०४ डीएस २४६१) सव्वादोन लाखाचा ऐवज जप्त केला. (2 lakh worth goods seized along with cattle pickup in city going for salughter Nashik Crime News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

हेही वाचा: Dengue Disease : डेंगी रुग्णांमध्ये झपाट्याने घट!

मंगळवारी (ता.१३) पहाटे ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक अधीक्षक संधू, विशेष पथकाचे इम्रान सय्यद, दिनेश शेरावते, सचिन बेदाडे आदींनी पवारवाडी पोलिसांच्या मदतीने हा छापा टाकला. मॅक्स पिकअपमध्ये दोरीच्या साहाय्याने ११ गोवंश कत्तलीसाठी आणली जात असल्याचे आढळले. संशयित पिकअप वाहन जागीच सोडून पळून गेले. या प्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात नफिस टकल्या व नासिर (पूर्ण नाव माहीत नाही, दोन्ही रा. मालेगाव) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Dr. Babasaheb Ambedkar यांचा पुतळा का हटवला?