Dengue Disease : डेंगी रुग्णांमध्ये झपाट्याने घट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dengue patients

Dengue Disease : डेंगी रुग्णांमध्ये झपाट्याने घट!

नाशिक : पावसाळा संपल्यानंतर डेंगीचा प्रादुर्भाव होत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. मात्र, यंदा डेंगीचा प्रभाव उतरताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत ९८ संशयित रुग्णांचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला. त्यातील १६ जणांना डेंगी असल्याचे निष्पन्न झाले. आत्तापर्यंत शहरात ६४६ डेंगी रुग्ण आढळून आले. मागील वर्षाच्या तुलनेत तेवढ्यानेच रुग्ण संख्या घटल्याचे दिसून येत आहे. (Dengue Disease Rapid decline in dengue patients Nashik News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

हेही वाचा: Nashik News : मालेगाव, सुरगाण्यात सर्वाधिक Model School!

या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. ऑक्टोबरअखेर चाललेल्या पावसानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना मोठ्या प्रमाणात डेंगीची लागण होत असल्याचे दरवर्षी दिसून येते. पावसाचे पाणी घराच्या आजूबाजूला टेरेस, बाल्कनी आदी ठिकाणी साठते. त्यातून डेंगी अळ्या तयार होऊन डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबर हे दोन महिने डेंगीसाठी पोषक कालावधी म्हणून गणले जातात.

मात्र, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांचा अहवाल महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला प्राप्त झाला. त्यामध्ये १ ते १० डिसेंबर या कालावधीमध्ये ९८ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील १६ जणांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले. शहराच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने विचार करता, ही संख्या फारच कमी आहे. मागील वर्षी याच महिन्यात जवळपास ९० हून अधिक डेंगी रुग्ण आढळले होते.

जानेवारी ते जुलै या दरम्यानच्या कालावधीमध्ये डेंगीचा प्रादुर्भाव फारसा झाला नाही. ऑगस्ट महिन्यात ९९ डेंगीचे रुग्ण आढळून आले. सप्टेंबर महिन्यात हीच संख्या १३९ झाली. ऑक्टोबर महिन्यात १४६ रुग्ण आढळून आले. नोव्हेंबर महिन्यात १७३ जणांना डेंगीचा डंक बसला.

हेही वाचा: Nashik News : पोलिस ठाण्यासाठी निरीक्षकांची आयुक्तांकडे ‘लॉबिंग’