भीषण अपघात! कारवर कंटेनर उलटून २ प्राथमिक शिक्षक ठार, ४ जण गंभीर | Nashik Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीषण अपघात! कारवर कंटेनर उलटून २ 
प्राथमिक शिक्षक ठार, ४ जण गंभीर

भीषण अपघात! कारवर कंटेनर उलटून २ प्राथमिक शिक्षक ठार, ४ जण गंभीर

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. पलटी घेताना कंटेनर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कारवर जाऊन धडकला. या अपघातात कारमधील जिल्हा परिषद शाळांचे ६ शिक्षक (Primary teachers) आणि शिक्षिका असल्याचे समजते. (Nashik Accident)

दुपारी साडेचार वाजता झालेल्या ह्या अपघातात २ शिक्षक जागीच ठार तर ४ शिक्षक-शिक्षिका गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन 2 गंभीर जखमी शिक्षिकांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. घोटी टोलनाका रुग्णवाहिकेचे २ गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान ह्या अपघातामुळे मुंढेगावजवळ मुंबईकडून येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा: दुर्दैवी! अपघातात पती-पत्नी जागीच ठार; २२ तारखेला होतं मुलाचं लग्न

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे महामार्गावर नाशिककडून येणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. पलटी घेत घेत हा कंटेनर MH 15 EB 0797 ह्या वाहनावर गेला. त्यामुळे ह्यामधील २ शिक्षक जागीच ठार आणि ४ शिक्षक शिक्षिका गंभीर जखमी झाल्या आहेत. हे सर्वजण इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील समनेरे भागातील शिक्षक असल्याचे समजते. शेवंता दादू रकीबे वे वय 42, गीतांजली कापडणीस - सोनवणे वय वय 42 रा. नाशिक ह्या गंभीर जखमी असून अन्य २ जखमींची आणि ठार झालेल्यांची नावे समजली नाहीत.

हेही वाचा: Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
loading image
go to top