Nashik News : अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 साई भक्तांवर काळाचा घाला

Death News
Death Newsesakal

सिन्नर (जि. नाशिक) : मुसळगाव एमआयडीसी मधील शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई येथील दोन साई भक्तांचा मृत्यू झाल्याची अतिशय हृदय द्रावक घटना मंगळवारी ( दि 20)सकाळी पहाटेच्या सुमारास घडली.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Death News
Nashik News : Helmetसक्तीची कारवाई पुन्हा जोमात; 300 दुचाकीस्वारांना ठोठावला दंड

घटनेचे सविस्तर वृत्त असे की मुंबई येथून साई संस्कृती फाऊंडेशन व राज प्रतिष्ठानच्यावतीने काढण्यात आलेल्या पायी पालखी यात्रेत शिर्डी येथे निघाले होते. आज (दि.20) पहाटे पालखी मुसळगाव शिवारात आली असता बी. एस. एल. कंपनीसमोर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने संजय शंभू जाधव (23) व महेश शंकर सिंग (23) रा. मीरा रोड, मुंबई यांना अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देऊन पसार झाले.

धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. सोबतच्या मित्रांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला. सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक त्रिभुवन करत आहेत.

Death News
Gram Panchayat Result : शेवटी शिंदे गटाच्या खासदारानं मुलाच्या पराभवाचा वचपा काढलाच; ठाकरे गटाला चारली धूळ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com