
Nashik : भंगाराच्या 2 दुकानांना आग
सिडको (जि. नाशिक) : अंबड लिंक रोड केवल पार्क येथील दोन भंगाराच्या दुकानांना (Scrap shop) आग लागल्याने लाखो रुपयांचे प्लॅस्टिक (Plastic) व साहित्य जळून खाक झाले. शेजारच्या मोकळ्या भूखंडावरील कचऱ्यानेदेखील (Waste) पेट घेतल्याने बराच वेळ ही आग धुमसत होती. (2 scrap shops Caught Fire Nashik News)
हेही वाचा: नाशिक : बनावट कागदपत्राव्दारे बॅंकेला 28 लाखांचा चुना
शनिवारी (ता.२८) दुपारी ही आग लागली. या वेळी बाजूलाच मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात भंगार प्लॅस्टिक, लाकडी फळ्या, पुठ्ठे व इतर साहित्य पडले होते. आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूच्या भूखंडावर ही आग भडकली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन सिडको, सातपूर व अंबड एमआयडीसी येथून चार बंब दाखल झाले. दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे रवींद्र लाड, इस्माईल काजी, फायरमन अविनाश सोनवणे, सोमनाथ शिंदे, कांतिलाल पवार, शुभम मोरे, शुभम लाड, सचिन लोखंडे यांनी प्रयत्न केले.
हेही वाचा: नाशिक-पुणे महामार्गावर अपघातात महाविद्यालयीन तरुणी ठार
Web Title: 2 Scrap Shops Caught Fire Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..