Nashik Accident : रायगडनगरजवळ अपघातात 2 गंभीर | 2 serious in an accident near Raigadnagar Nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accidental car

Nashik Accident : रायगडनगरजवळ अपघातात 2 गंभीर

Nashik Accident : मुंबई- आग्रा महामार्गावर रायगडनगरजवळ कार आपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री (ता.३०) पावणेबाराच्या सुमारास वाडीवऱ्हेहून नाशिककडे जणारी कार (एमएच १५, एच क्यू ८००२) रायगडनगरजवळील तुळजा हॉटेलसमोर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने दोन ते तीन पलट्या घेतल्या आणि ती रस्त्याच्या कडेला नालीत गेली. (2 serious in an accident near Raigadnagar Nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शंतनू रामदास मते (२८), सुमित रामदास मते (३१, दोघे. रा. नाशिक) हे गंभीर जखमी झाले. दोघांना तोंडाला तसेच हातापायांना गंभीर जखमा झाल्या आहेत.

जखमीना नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या गोंदे फाटा येथील मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती पाटील गुंड यांनी तातडीने नाशिक येथील खासगी रूग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Nashikaccident case