म्हसरूळ : व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केल्याच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला | Latest Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Attack

व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केल्याच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला

म्हसरूळ (नाशिक) : व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये समाविष्ट केल्याच्या कारणातून झालेल्या हाणामारीत दोघा संशयितांनी पंचवटीतील विजयनगर कॉलनीमधील एका युवकावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यात दीपक डावरे (वय २१ रा. संत जनार्दन स्वामी नगर,आडगाव नाका) हा युवक गंभीर जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान आहेर याने शुक्रवार (ता.०३) रोजी मित्रांचा व्हॉटस् ॲप ग्रुप तयार केला होता. या ग्रुप मध्ये संशयित हल्लेखोर दोघांना समाविष्ट केले होते. मात्र 'तू आम्हाला ग्रुपमध्ये का समाविष्ट केले, डिलिट कर, असे म्हणत संशयित यांनी समाधान आहेर यास शिवीगाळ केली होती. हा घडलेला प्रकार समाधान आहेर याने दिपक डावरेसह अन्य मित्रांना सांगितला.

यावर शनिवारी दीपक व अन्य मित्र क्रिकेट खेळत असताना दीपकने संशयित दोघांना फोन लावून काय झाले असेल ते मिटवून घेऊ, असे म्हणत दोघांना विजय नगर कॉलनीतील देवी मंदिर भागातील मैदानावर बोलावून घेतले. ग्रुपमध्ये ऍड केल्याने काय झाले, असे दीपकने म्हटल्यावर संशयितांमध्ये बाचाबाची झाली. त्यावर दिपकने संशयितावर बॅट उगारली. त्याचा राग आल्याने प्रतित्युत्तर म्हणून संशयित याने दुचाकीच्या मॅटखाली ठेवलेला कोयता काढून दीपकवर कोयत्याने वार केले. यात दिपक हा गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपकला पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला.

हेही वाचा: संतापजनक! कंत्राटी कर्मचारी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

यावेळी हल्लेखोरांनी कोयता खाली टाकून व दुचाकी सोडून पळ काढला. त्यावर घटनास्थळावरील काही मित्रांनी जखमी दीपकला उपचारार्थ प्रथम शासकीय रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यास नातेवाईकानी खासगी रुग्णालयात हलविले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही संशयिताना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा: कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपीमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश

Web Title: 2 Suspects Attacked On Youth With A Sharp Sickle In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikattackYouth
go to top