आकर्षक राख्यांची महिलांना भुरळ; रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठ सजली | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women buying rakhi.

आकर्षक राख्यांची महिलांना भुरळ; रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठ सजली

जुने नाशिक : दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत.

महिलांना या राख्या भुरळ घालत आहे. बहिण- भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन गुरुवारी (ता. ११) साजरा होणार आहे. महागाईमुळे दरांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही व्यावसायिकांनी सांगितले. (20 percent increase in prices due to inflation on occasion of Raksha Bandhan nashik latest marathi news)

बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यासह पारंपारिक गोंडा राखी (देव राखी) बाजारात विक्रीस दाखल झाली आहे. महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. शहराच्या विविध भागांमध्ये लहान- मोठ्या राखी विक्रीचे दुकाने सजल्याचे दिसत आहे.

परदेश तसेच शहराबाहेर कामानिमित्त असलेल्या भाऊरावांना वेळेत राखी पोचण्यासाठी आत्तापासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिली जात आहे.

दुसरीकडे व्यवसायिकांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष राखी विक्री व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. यंदा परिस्थिती सामान्य असल्याने ग्राहकांमध्येदेखील उत्साह आहे.

आतापासूनच किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. सुमारे ५० टक्क्याने ग्राहक वाढले असल्याची माहिती व्यवसायिकांकडून देण्यात आली. कुंदन वर्क आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे.

चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहे. लायटिंग, लाकडी, पपेट, कडा राखीसह पारंपारिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आले आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये OBCच्या एका जागेत घट; 36 ऐवजी 35 नगरसेवक

राखींमधील नावीन्यता

या वर्षी लायटिंग राखीमध्ये स्पिनर लायटिंग राखी आणि कपल राखी अर्थात महिला पुरुष दोघांसाठीही असलेली राख्या बाजारात आल्या आहेत. स्पिनर राखीस असलेले बटन दाबले की विविध रंगीत लायटिंग राखीची आकर्षकता वाढवते.

तर कपल राखीमध्ये दोन राख्यांपैकी महिलांना सिंगल दोऱ्याची अर्थात बांगड्यांना बांधता येईल अशी लट राखी आणि तशीच बनावट असलेली डबल दोऱ्याची पुरुषांसाठी राखी यंदाचे नावीन्य आहे.

असे आहे राखींचे प्रकार

राखींचे प्रकार दर रुपयात
साधी आणि स्पिनर लायटिंग ४० ते ६५
उडन (लाकडी) ३० ते ४०
कुंदन वर्क २० ते ११०
मोती १० ते ५०
जरदोशिवर ३० ते ३५
चिडा, लुब्बा २२ ते ५०
कपल राखी ४० ते ५०
पपेट ५० ते ६०
कडा १६५
देवराखी एक डझन ०५
चांदी पॉलिश राखी १२ ते १००


"परिस्थिती सामान्य असल्याने यंदा राख्यांना मागणी वाढली आहे. त्या प्रमाणात आवक कमी आहे. महागाईमुळे २० टक्क्यांनी दर वाढले आहेत. "- राजेंद्र जैन व्यावसायिक

हेही वाचा: पीकविमा योजनेमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 42 टक्के शेतकरी सहभाग

Web Title: 20 Percent Increase In Prices Due To Inflation On Occasion Of Raksha Bandhan Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top