
Nashik News : नाशिकमध्ये 132 वर्षात साकारलीत 20 मंदिरे! काळाराम मंदिरासाठी सर्वाधिक 23 लाखांचा खर्च
जुने नाशिक : नाशिककर हो ! माहिती आहे काय, तुम्हाला? १७३८ ते १८७० या १३२ वर्षांमध्ये तीर्थक्षेत्री नाशिकमध्ये किती मंदिरांची उभारणी झाली आहे ते...महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाच्या आवारातील फलक या प्रश्नाच्या उत्तराची साक्ष देतोयं.
१३२ वर्षांमध्ये २० मंदिरांची उभारणी झालीय. त्यात सर्वाधिक २३ लाखांचा खर्च काळाराम मंदिराच्या उभारणीवर झाले आहेत. (20 temples built in 132 years in Nashik Maximum expenditure of 23 lakhs for Kalaram temple Nashik News)
शहराला पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक महत्त्व आहे. देश-विदेशातील भाविकांसह पर्यटक इथली संस्कृती जाणून घेण्यासाठी येतात. सतराव्या ते अठराव्या शतकातील मंदिरांची माहिती ब्रिटिशकालीन महापालिकेच्या इमारतीत अजूनही आपणाला पाहावयास मिळते.
कार्यालयात प्रवेश करताच उजव्या हाताच्या भिंतीवर हा फलक आहे. पंचवटीतील विठ्ठल मंदिरास सर्वात कमी पाच हजाराचा खर्च झाला आहे. तत्कालीन नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या यादीत एका स्मारकाचा समावेश आहे. सर्वाधिक शिव मंदिरांचा समावेश आहे.
काही मंदिरे सुस्थितीत
शतकाहून अधिक परंपरा राहिलेल्या मंदिरांपैकी काही मंदिरे सुस्थितीत आहेत. काहींची देखभाली अभावी काहीशी दुरवस्था झाली. काही मंदिरांची मात्र मोठी दुरवस्था झाली आहे. त्यांचा बहुतांशी भाग खचला आहे.
मंदिरांवर गवत उगलले आहे. सुंदर नारायण मंदिरांचे पुनर्निर्माण पुरातत्त्व विभागाकडून सुरु आहे. मुख्य कलश गाभाऱ्याची काम पूर्ण करण्यात आले. अन्य कामाचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आला आहे. बहुतांशी मंदिरे विश्वस्त मंडळाकडे असल्याने त्यांच्या कामात मात्र अडचणी येत असल्याने त्यांची काहीशी दुरवस्था झाल्याचे दिसते.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
मंदिर आणि स्मारक वर्ष खर्च
काळाराम मंदिर १७८२ २३ लाख
नारोशंकर मंदिर १७४७ १८ लाख
सुंदर नारायण मंदिर १७५५ १० लाख
उममहेश्वर मंदिर १७५८ ०२ लाख
निळकंठेश्वर मंदिर १७४७ ०१ लाख
बालाजी मंदिर १७७१ ०१ लाख
कपालेश्वर मंदिर १७३८ ३० हजार
भद्रकाली मंदिर १७९० ३० हजार
तीळ भांडेश्वर मंदिर १७७३ २५ हजार ६००
शंकराचार्य मठ १७७४ १६ हजार
पंचरत्नेश्वर मंदिर १७५८ १५ हजार
मुक्तेश्वर मंदिर १८३० १५ हजार
कपूरथळा स्मारक १८७० १२ हजार ६१०
विठ्ठल मंदिर १७५५ ०५ हजार