पशुसेवेला आता महागाईची जखम; पशु वैद्यकीय सेवा शुल्कात 20 पटीने वाढ

Dog at Veternary
Dog at Veternaryesakal

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत (Veternary Hospitals) पशुपालकांकडील रूग्ण पशु- पक्ष्यांना विविध पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी सेवाशुल्काचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. विविध समस्यांनी बेजार असलेल्या शेतीपूरक व्यवसायाला ही दरवाढ दुष्काळात तेरावा महिना ठरणार आहे. शासनाने तब्बल वीस पट सेवा दरात वाढ केली असून, त्याचा सर्वाधिक फटका दुग्ध व कत्तलखाना व्यवसायाला बसणार आहे. आता बीफचेही दर वाढणार असल्याने ग्राहकांचे धाबे दणाणले आहे. प्रस्तावित सुधारित सेवाशुल्काचे दर २१ जूनपासून लागू होणार आहे. (20 times increase in veterinary service charges due to Inflation Nashik News)

पशुसंवर्धन विभागांतर्गत सर्व प्रकारच्या रुग्ण पशु, पक्षी, तपासणी, चाचणीसाठीचे दर वाढवण्यात येत असल्याचा अध्यादेश राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आला आहे. ही दरवाढ घोषित करताना उपचार साहित्य, औषधांच्या किंमतीत बाजारपेठेत वाढ झाल्याचे कारण देण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या पशुपालकांना पशुंना वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी आता खिसा रिकामा करावा लागणार आहे. या दरवाढीचा फटका शेती उपयोगी पशुधन पालन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढपाळ, अश्‍वपालन, कुक्कुटपालन, वराहपालन व्यावसायिकांना बसणार आहे. देशी- विदेशी श्‍वान, मांजर या प्राण्यांच्या हौशीपालकांना आता जादा दराने सेवाशुल्क देऊन पशु वैद्यकीय सेवा घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा १९७६ (सुधारणा १९९५) नुसार अनुसूचित पशूंची कत्तलपूर्व वैद्यकीय तपासणी करण्यात येते. त्यासाठी प्रति पशु २० रुपये असलेला दर आता २०० रुपये प्रति पशु करण्यात आला आहे. तब्बल २० पटीने तपासणी शुल्क वाढविण्यात आले आहे. कत्तलखान्याला येणारा खर्च थेट ग्राहकांकडून वसुलीशिवाय पर्याय नसल्याने बीफची दरवाढची भीती व्यक्त होत आहे. पशुपालकही या अध्यादेशाने व्यतीत झाले आहे. प्रस्तावित दरवाढ मागे घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

सुधारीत दरांचा तपशिल

अ.क्र. बाब/ सुधारित दर (रुपये)

१ पशुस्वास्थ विषयक

सेवा केस पेपर/निशुल्क

अ) उपचार १०

ब) खच्चीकरण (वळू, रेडा

वराह, बोकड व नर मेंढा) १०

२) रोग प्रतिबंधक लसीकरण

अ) जनावरे (लहान तसेच मोठी) १

ब) कुक्कुट पक्षी १

३) लहान शस्त्रक्रिया

अ) कुत्री व मांजर

ब) मोठी जनावरे (खच्चीकरण वगळून) ५०

क) वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर २०

४) मोठ्या शस्त्रक्रीया

अ) कुत्री व मांजर १५०

ब) मोठी जनावरे ७०

क) वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर ५०

५) कृत्रिम रेतन व अनुषंगिक सेवा

अ) कृत्रिम रेतन ५०

६) गर्भधारणा तपासणी १०

७) गायी व म्हशींतील वंध्यत्व तपासणी १०

८) रोग नमुणे तपासणी

अ) डी.एल.सी, आरबीसी काऊंट,

डब्ल्यूबीसी काऊंट, रक्त काचपट्टी,

शेण नमुने, मुत्र नमुने, स्क्रॅपिंग्ज, इतर प्रत्येकी १०

९) रक्त व रक्तजल तपासणी

अ) ग्लुकोज, फॉस्फरस, क्रियॅटीनीन

कॅल्शियम,रक्तातील हिमोग्लोबीन प्रत्येकी २०

१०) उती नमुने तपासणी १०

११) पाणी, खाद्य, व्हिसेरा नमुन्याची

विषबाधा तपासणी १००

१२) दुध नमुने तपासणी १००

१३) क्ष- किरण तपासणी

अ) लहान जनावरे (कुत्री, मांजर, वासरे, शेळी,

मेंढी, वराह व इतर) १००

ब) मोठी जनावरे १००

१४) सोनोग्राफी

अ) लहान जनावरांच्या प्रत्येक तपासणीकरिता

(कुत्रे, शेळी, मेंढी, वराह व इतर लहान पशु) १००

ब) मोठ्या जनावरांच्या प्रत्येक तपासणीकरिता १००

Dog at Veternary
टेबलावर दिसताय अधिकारी-कर्मचारी; कारवाईच्या बडग्यामुळे कामांचा निपटारा

१५) आरोग्य दाखले

अ) मोठी जनावरे ५०

ब) लहान जनावरे २०

१६) महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा

१९७६ (सुधारणा १९९५) अंतर्गत

अनुसूचित पशुंची कत्तलपुर्व तपासणी २००

१७) शवविच्छेदन (न्याय वैद्यक प्रकरण वगळून) १००

Dog at Veternary
Nashik : चित्रकलाच बनली नवनिर्मितीचे साधन

"पशुसंवर्धन करणे आधीच जिकिरीचे बनले आहे. चारा, पाणी आणि संरक्षण यातच जनावरांची जोपासना करताना पशुपालकांना मेहनत घ्यावी लागते. त्यातच रुग्ण पशुंच्या सेवादरात वाढ करणे योग्य नाही. अध्यादेश मागे घ्यायला हवा."

- बाजीराव निकम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दाभाडी

"कुक्कुटपालन व्यवसायात साथीचे आजार हा कळीचा मुद्दा आहे. वर्षभर औषधोपचार करावा लागतो. त्यातच रुग्ण पशुंच्या सेवा दरात भरमसाठ वाढ केल्याने हा उद्योग उद्ध्वस्त होईल."

- राजेंद्र शेवाळे, कुक्कुटपालन व्यावसायिक, टेहरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com