Nashik News : सिन्नरला बिबट्याचा धुडगूस; पोल्ट्रीची जाळी तोडून 200 कोंबड्या केल्या फस्त!

leopard attack news
leopard attack newsesakal

लेखक : विकास गिते

सिन्नर (जि. नाशिक) : दिवसेंदिवस बिबट्याची दहशत तालुक्यात होत असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. बिबट्याचे हल्ले होण्याचे प्रकार वाढतच असून कासारवाडी परिसरात अचानक रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने कासारवाडी येथील कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये घुसून मध्यरात्रीच्या वेळी बिबट्याने एका पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत प्रवेश करत 200 कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या हल्ल्याने शेतकरी राजा भयभीत झालेला आहे. (200 chickens killed by breaking poultry net by leopard at sinnar nashik Latest Marathi News)

त्यामुळे रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. बिबट्याकडून परिसरातील पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असल्याचे प्रकार घडत असताना आता बिबट्याने थेट पोल्ट्रीमध्ये शिरुन कोंबड्यांवरच ताव मारला आहे. कासारवाडी येथे वैभव चंद्रकात देशमुख यांची 5 हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म आहे. महिनाभरापूर्वीच त्यांनी पोल्ट्रीत कोंबड्या टाकल्या होत्या. सद्यस्थितीत कोंबड्यांचे वजन दिड किलोच्या आसपास आहे.

रविवारी (दि.27) रात्री बिबट्याने पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत प्रवेश केला व दिसेल त्या कोंबड्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. कोंबड्याही बेदरुन सैरावैरा पळू लागल्या. बिबट्याने यात अनेक कोंबड्या फस्त करत तेथून पळ काढला. कोंबड्याचा आवाज ऐकूण शेजारीच राहत असलेले देशमुख यांनी बघितले असता अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे लक्षात आले. यात जवळपास 200 कोंबड्या मृत पावल्या आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

leopard attack news
Nashik Traffic Jam : मुंबई- नाशिक मार्गावर वाहतूक कोंडीने प्रवाशी अन् वाहनचालक हैराण!

सकाळी ग्रामस्थांना याबाबत माहिती कळताच माजी उपसरपंच सचिन देशमुख यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती देत तात्काळ पंचनामा करण्याची मागणी केली. वनविभागाचे आकाश रुपवते यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. देशमुख यांचे यामुळे लाखांचे नुकसान झाले असून तात्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. वनविभागाकडून पिंजऱ्याची तरतूद केली जात असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष निलेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दत्ता देशमुख, अनिल देशमुख, नंदू देशमुख, शुभम लोकरे, मोरया मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज जगताप, चंद्रकांत देशमुख, सोमा साळुंखे, लवेश साळुंखे उपस्थित होते.

leopard attack news
Champa Shashti : नांदूरवैद्य येथील अश्व जोपासतोय 11 वर्षांपासून जेजुरी वारीची परंपरा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com