MIDCत उद्योग विस्तारासाठी 2 हजार एकर जागा; नितीन गवळी यांची माहिती

midc news
midc newsesakal

नाशिक : नाशिकच्या उद्योग विस्तारासाठी आगामी वर्षभरात शहरालगतच्या विविध औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे दोन हजार एकर जागा उपलब्ध होणार आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती 'एमआयडीसी'चे विभागीय अधिकारी नितीन गवळी यांनी दिली.

'मी नाशिककर' सोबतच्या बैठकीत ही माहिती दिली आहे. पाथवे टू मॅग्नेटिक महाराष्ट्र ३.० मधील नाशिकच्या सहभागासाठी हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले. (2000 acres of land for industrial expansion in MIDC Nitin Gawli information nashik Latest Marathi News)

'मी नाशिककर' या बिगरराजकीय चळवळीच्‍या माध्यमातून एबीबी लिमिटेडच्या सभागृहात बैठक झाली. एबीबीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश कोठावदे, राष्ट्रीय एमएसएमई बोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकार, सीआयआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष एम. डी. देशमुख, निपम नाशिकचे अध्यक्ष प्रकाश बारी, एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे डॉ. उदय खरोटे, सिन्नर तालुका औद्योगिक संस्थेचे आवारे रामकर्णा, महाराष्ट्र चेंबरचे सुधाकर देशमुख, स्टाईसचे अरुण चव्हाणके, ॲड. अशोक सोनावणे, आयमाचे मनीष रावल, लघुउद्योग भारतीचे संजय महाजन व ‘मी नाशिककर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोठेकर उपस्थित होते.

बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यात माळेगाव, मापारवाडी, राजूर बहुला, घोटी, अजंग (मालेगाव) येथे मिळून जवळपास दोन हजार एकर जागेसाठी प्रक्रिया सुरू असल्‍याचे सांगितले. १९७० ते २०२० कालावधीत एमआयडीसी नाशिकतर्फे जवळपास साडेचार हजार एकर जागेचे वाटप, तसेच गेल्या दीड वर्षात साडेसातशे एकर जागेचे वाटप होऊन सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक व त्यातून जवळपास २० हजार रोजगारनिर्मिती झाल्‍याची माहिती दिली. इगतपुरी, घोटीमध्ये ७००-८०० एकर जागेसाठी प्रयत्न करून तेथे हर्बल फार्मा कंपन्यांसाठी हबची चाचपणी केली जाणार असल्‍याचेही सांगितले.

midc news
Crime Update : घरफोडीची 24 तासात उकल

आयटी पार्कसाठी ५० एकर

प्रस्तावित राजूर बहुला येथील जागेमध्ये एसटीपीआयसाठी ५० एकर जागा आयटी पार्कसाठी राखीव ठेवण्याचा विचार असल्‍याचे सांगितले. सौरऊर्जा उत्पादन करून त्यातून कमी दराने लहान उद्योगांना वीज पुरवावी. त्यासाठी अशा सौरऊर्जा प्रकल्पास एमआयडीसीमध्ये जागा देण्याची विनंती केली. इलेक्ट्रिकल उद्योगांसाठी आवश्यक टेस्टिंग लॅबची सुविधा लवकरच एबीबी उभारणार असल्‍याचे जाहीर केले.

समितीची स्‍थापना

नाशिकमधील मोठे उद्योग आणण्यासाठी, तसेच नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी ‘मी नाशिककर’तर्फे समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रमुख म्‍हणून मनीष रावल काम पाहतील. समन्वयक संजय कोठेकर, मार्गदर्शक- गणेश कोठावदे व पीयूष सोमाणी असतील.

शासनासोबतचे समन्वयक प्रदीप पेशकार, तर सदस्‍य म्‍हणून निखिल पांचाळ, मनीष कोठारी, वरुण तलवार, संजय महाजन, एम. जी. के. कुलकर्णी, धनंजय बेळे, मंगेश पाटणकर, डॉ. उदय खरोटे काम पाहतील. विशेष निमंत्रित म्हणून नितीन गवळी असतील.

midc news
बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बाजार जानेवारीत भरणार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com