बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बाजार जानेवारीत भरणार!

Election
Electionesakal

येवला (जि. नाशिक) : अगोदर कोरोणाच्या दोन लाटा तर नंतर न्यायालयाच्या आदेशाने लांबणीवर पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून पुढील वर्षी २९ जानेवारी रोजा मतदान होणार आहे.

यात जिल्ह्यातील दहा पालिकांचाही फड रंगणार असून आज कार्यक्रम जाहीर होताच हालचाली सुरू झाल्या आहेत. (program of market committee election with voter list has been announced by authority Nashik News)

बाजार समित्यांची मुदत संपून दोन वर्षे होत आले तरी अनेक ठिकाणी निवडणुक झालेली नाही.सध्या लासलगाव व पिंपळगाव बसवंत बाजार समितीवर संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती तर इतर सर्वच ठिकाणी प्रशासक मंडळ कामकाज पाहत आहे.निवडणूक प्राधिकरणाने यापूर्वी ऑक्टोबरमध्ये

बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.मात्र त्यावेळी सोसायटी गटातील संचालक नेमके जुने की नवे मतदार यादीत घ्यावेत हा प्रश्न निर्माण झाल्याने न्यायालयात धाव घेण्यात आली होती. कृषी पत संस्थांच्या निवडणूकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका सुरु करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर १३ याचिका दाखल झाल्या होत्या.

त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने निवडणूकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका तातडीने पूर्ण करुन त्यानंतर बाजार समित्यांच्या निवडणूका पूर्ण करण्याबाबत आदेश दिले.त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाली असून पावसाळ्याचेही दिवस संपत आल्याने आज राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समिती यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.

मंत्री दादा भुसेच्या मालेगाव बाजार समितीची मुदत या वर्षी मार्चमध्ये संपली आहे तर माजी मंत्री छगन भुजबळाच्या मतदारसंघातील व आशिया खंडातील प्रसिद्ध लासलगाव बाजार समितीची मुदत मेमध्ये संपली असून येवला बाजार समितीची मुदत दीड वर्षांपूर्वी संपली आहे.येथेही निवडणुकीचा फड रंगताना दिसेल.

या निवडणुकीच्या निमित्ताने माजी पालकमंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बनकर, राहुल आहेर, सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे, नितीन पवार, विजय करंजकर, माणिकराव कोकाटे, अनिल कदम, श्रीराम शेट्ये, देवीदास पिंगळे, अनिल आहेर, शिवाजी चुंबळे या नेत्यांसह त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या स्थानिक नेत्यांसाठी देखील ही निवडणूक अस्तित्व ठरवणारी असेल हे नक्की.

Election
Crime Update : घरफोडीची 24 तासात उकल

●प्रचलित पध्दतीने निवडणूक

बाजार समितीच्या निवडणूकीकरीता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पतसंस्था,बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची यादी २७ सप्टेंबरपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.

याशिवाय बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी १ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

● घोषणा झाली,पुढे काय?

नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याची घोषणा केली आहे. मात्र,आजच्या कार्यक्रमांमध्ये सोसायटी व ग्रामपंचायत गटाचा स्पष्ट उल्लेख आला आहे.यामुळे आगामी निवडणुकीत अंमलबजावणी होताना दिसत नसून प्रचलित पद्धतीनेच ही निवडणूक होईल असे चित्र दिसतेय

● असा आहे मतदारयादी कार्यक्रम

√ जिल्हा उपनिबंधक व गटविकास अधिकाऱ्याकडून सदस्य यादी मागवणे- 27 सप्टेंबरपर्यंत

√ प्रारूप मतदार यादीसाठी सदस्य सूची बाजार समितीला देणे - 3 ऑक्टोबर

√ बाजार समितीने प्रारूप मतदार यादी तयार करणे- 3 ते 31 ऑक्टोबर

√ बाजार समितीने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करणे- 1 नोव्हेंबर

√ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यानी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे- 14 नोव्हेंबर

√ प्रारूप मतदार यादीवर आक्षेप, हरकती मागवणे- 14 ते 23 नोव्हेंबर

√ प्राप्त आक्षेप,हरकतींवर निर्णय घेणे- 23 ते 2 डिसेंबर

√ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे- 7 डिसेंबर

● असा आहे निवडणू‍क कार्यक्रम

√ निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे- 23 डिसेंबर

√ नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी- 23 ते 29 डिसेंबर

√ नामनिर्देशनपत्राची छाननी - 30 डिसेंबर

√ उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी- 2 ते 16 जानेवारी

√ उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध व निशाणी वाटप - 17 जानेवारी

√ मतदान- 29 जानेवारी

√ मतमोजणी 30 जानेवारी

■ अशी संपली बाजार समित्याची मुदत..

-नाशिक - १९ ऑगस्ट २०२०

-नांदगाव - १९ ऑगस्ट २०२०

-कळवण - २८ ऑगस्ट २०२०

-येवला - १९ ऑगस्ट २०२०

-चांदवड - १६ ऑगस्ट २०२०

-पिंपळगाव - २ ऑगस्ट २०२०

-सिन्नर - २० ऑगस्ट २०२०

-लासलगाव - मे २०२१

-मालेगाव - मार्च २०२१

Election
मिरवणूक मार्गावर NMCकडून विशेष सुविधा; आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com