‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेतून 21 ग्रंथपेट्या डॅलस येथे रवाना

Vinayak Ranade handing over the book box to Harshad Khadilkar from the 'Granth Uyhi Dari' scheme to be delivered to Dallas.
Vinayak Ranade handing over the book box to Harshad Khadilkar from the 'Granth Uyhi Dari' scheme to be delivered to Dallas.esakal

नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी या योजनेतून नुकतेच २१ ग्रंथपेट्या डॅलस येथे रवाना करण्यात आल्या आहेत. तेथील १७ मराठी कुटुंबांनी या योजनेसाठी देणगी देऊन सहकार्य केले आहे. (21 book boxes sent to Dallas under Granth tumchya Dari scheme nashik Latest Marathi news)

येथील ग्रंथ तुमच्या दारी परिवारातील मुकुंद खाडिलकर यांचे पुतणे हर्षद हे अनेक वर्षांपासून डॅलस येथे आहेत. तेथील सर्वांना मराठी दर्जेदार पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून त्यांनी समन्वयक म्हणून सक्रिय पुढाकार घेतला.

त्यांना येथील उद्योजक कौस्तुभ मेहता यांच्या भगिनी पुणे येथील परिमल गांधी, मुळचे नाशिककर व सध्या डॅलस येथे असलेले पद्माकर खडतरे यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, गेल्या १३ वर्षांत या योजनेंतर्गत भारत आणि भारताबाहेर १५ देशांत फिरत्या ग्रंथपेट्यांच्या स्वरूपात आतापार्यत अडीच कोटींपेक्षा जास्त किमतीची पुस्तके रवाना करण्यात आली असल्याचे या योजनेचे प्रवर्तक विनायक रानडे यांनी सांगितले.

Vinayak Ranade handing over the book box to Harshad Khadilkar from the 'Granth Uyhi Dari' scheme to be delivered to Dallas.
Admission 2022 : अकरावीचे 3 दिवसांत 26 टक्‍के जागांवर प्रवेश

एका ग्रंथपेटीत २५ वेगवेगळी पुस्तकं आहेत. त्या त्या देशाच्या विविध भागात या पेट्या वाचक कुटुंबाला तीन महिन्यासाठी उपलब्ध होतात. त्यानंतर त्या परस्परांमध्ये बदलत्या ठेवल्यामुळे सर्वाना मोठ्या प्रमाणात दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध होत राहते.

भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झरलॅन्ड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, मॉरिशस, ओमान, मस्कत, सॅनफ्रान्सिस्को, बे एरिया, लंडन, श्रीलंका, ब्रिस्बेन, टोरांटो, होस्टन, डॅलस येथे ग्रंथपेट्या पाठविण्यात आल्या असल्याचेही श्री. रानडे यांनी सांगितले.

Vinayak Ranade handing over the book box to Harshad Khadilkar from the 'Granth Uyhi Dari' scheme to be delivered to Dallas.
उत्तर महाराष्ट्रात 7 रेल्वे स्थानकावर वैद्यकीय उपचार केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com